Breaking News

“लोकनेते रामशेठ ठाकूर ‘रयत’च्या पाठिशी खंबीर”

अध्यक्ष खासदार शरद पवार यांचे गौरवोद्गार

अहमदनगर : प्रतिनिधी
रयत शिक्षण संस्थेच्या कोणत्याही शाखेला कोणतीही अडचण आली की, आमच्या मागे हक्काने रयतचे मॅनेजिंग कौन्सिल सदस्य लोकनेते रामशेठ ठाकूर हक्काने उभे राहतात, असे गौरवोद्गार ‘रयत’चे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी कर्जत येथे काढले.
अहमदनगर जिल्ह्यतील कर्जत येथील रयत शिक्षण संस्थेच्या दादा पाटील महाविद्यालयात शारदाबाई पवार सभागृहाचा उद्घाटन सोहळा मंगळवारी (दि. 21) आयोजित करण्यात आला होता. या सभागृहाचे उद्घाटन ‘रयत’चे चेअरमन डॉ. अनिल पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झाले. या कार्यक्रमाचे औचित्य साधून महाविद्यालयातील संगणक प्रयोगशाळेचे उद्घाटन मॅनेजिंग कौन्सिलचे सदस्य लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते झाले.
खासदार शरद पवार पुढे म्हणाले, जामखेड कर्जत तालुक्यातील रयतसाठी देणगी दिलेल्या सर्वांचे अभिनंदन केले. दुष्काळग्रस्त असणारा कर्जत तालुका आज विकसित होत आहे. आज या परिसरामध्ये विविध शैक्षणिक, सामाजिक, धार्मिक कार्यक्रमांसाठी दर्जेदार सभागृह गरजेचे होते ते आज पूर्णत्वास आले असल्याचे सांगीतले तसेचह रयत शिक्षण संस्थेचे हे भाग्य आहे संस्थेच्या कोणत्याही शाखेमध्ये कोणतीही समस्या उद्भवली किंवा कोणताही नवीन उपक्रम घेतला की कश्याचीही अपेक्षा न ठेवता लोकनेते रामशेठ ठाकूर स्वतः पुढाकार घेतात असे प्रतिपादन केले.
या सोहळ्यावेळी रयत गीतासोबत दादा पाटील महाविद्यालय ः एक दृष्टीक्षेप ही चित्रफीत दाखविण्यात आली. रयत शिक्षण संस्थेचे चेअरमन डॉ. अनिल पाटील यांनी या वेळी शारदाबाई पवार सभागृह हे संस्थेच्या इतिहासात पहिल्यांदाच उभारल्याबद्दल राजेंद्र तात्या फाळके व आमदार रोहित पवार यांचे अभिनंदन केले आणि रयत शिक्षण संस्थेचे हे पहिले आणि सर्वोत्कृष्ट सभागृह असल्याचे सांगितले.
या समारंभाला संस्थेचे व्हाईस चेअरमन अ‍ॅड. भगीरथ शिंदे, संस्थेचे उपाध्यक्ष अरुण कडू पाटील, मॅनेजिंग कौन्सिल सदस्य दादाभाऊ कळमकर, मीनाताई जगधने, बाबासाहेब भोस, बाळासाहेब बोठे, अ‍ॅड. रवींद्र पवार, एम. सी. शेख, संस्थेचे उत्तर विभागीय अध्यक्ष आमदार आशुतोष काळे, सचिव प्राचार्य डॉ. विठ्ठल शिवणकर, सहसचिव प्राचार्य डॉ. शिवलिंग मेनकुदळे, मॅनेजिंग कौन्सिल सदस्य राजेंद्र तात्या फाळके, जनरल बॉडी सदस्य आमदार रोहित पवार, अंबादास पिसाळ, महाविद्यालय विकास समितीचे सदस्य बप्पाजी धांडे, राजेंद्र निंबाळकर, महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ. संजय नगरकर, बांधकाम समिती चेअरमन डॉ. संतोष लगड, उत्तर विभागाचे इन्स्पेक्टर तुकाराम कन्हेरकर, कर्जतच्या नगराध्यक्षा उषा राऊत, माजी विद्यार्थी संघाचे अध्यक्ष सुभाषचंद्र तनपुरे, दादा पाटील, निर्मला पाटील, सुनंदाताई पवार, शंकर देशमुख, बाजीराव कोरडे, अशोक बाबर, किरण पाटील, अंबादास गारुडकर, माजी सचिव शिवाजीराव भोर, ज्ञानदेव पांडुळे, पोकळे, प्राचार्य डॉ. ज्ञानदेव मस्के, प्राचार्य डॉ. एन. एस. गायकवाड, प्राचार्य डॉ. बाळ कांबळे, प्राचार्य डॉ. थोपटे, प्राचार्य डॉ. मोहन राजमाने यांच्यासह विविध शाखांचे पदाधिकारी, मुख्याध्यापक आणि शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Check Also

खासदार श्रीरंग बारणे यांच्या रूपाने पंतप्रधान नरेंद्र मोदींचे हात बळकट करा

माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांचे आवाहन पनवेल : रामप्रहर वृत्त पिंपरी-चिंचवडकर खासदार श्रीरंग बारणे …

Leave a Reply