गव्हाण : रामप्रहर वृत्त : मावळ लोकसभा मतदारसंघातील शिवसेना, भाजप, रिपाइं आणि मित्रपक्ष महायुतीचे उमेदवार श्रीरंग बारणे यांच्या प्रचारार्थ वहाळ, मोरावे आणि कोपर येथे सोमवारी प्रचार रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी पंचायत समिती सदस्य रत्नप्रभा घरत यांची प्रमुख उपस्थिती होती. या वेळी गव्हाण सरपंच हेमलता भगत, वहाळ उपसरपंच अमर म्हात्रे, पनवेल शिवसेना चिटणीस हनुमान भोईर, उलवे नोड शिवसेना अध्यक्ष मनोज घरत, गव्हाण ग्रामपंचायत सदस्य विजय घरत, शिवसेना महिला मोर्चा तालुकाध्यक्ष मेघा कटेकर, मदन पाटील, नंदू ठाकूर, कोळी समाज अध्यक्ष उत्तम कोळी, मंजुळा कोळी, शाखा प्रमुख अनिल घरत, विनोद पाटील, अशोक सर, उलवे नोड उपाध्यक्ष कैलास मिश्रा, पनवेल तालकुा सरचिटणीस रवींद्र शिंदे, आशा पाटील, नीलम ठाकूर यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.
