Breaking News

आरोग्य महाशिबिराची जय्यत तयारी

पनवेल : रामप्रहर वृत्त

सिडकोचे अध्यक्ष, भाजपचे रायगड जिल्हाध्यक्ष, कार्यसम्राट व लोकप्रिय आमदार प्रशांत ठाकूर यांच्या 45व्या वाढदिवसाचे औचित्य साधून श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ, रायगड मेडिकल असोसिएशन आणि भारतीय जनता पक्ष पनवेल यांच्या संयुक्त विद्यमाने येत्या रविवारी (4 ऑगस्ट) खांदा कॉलनी येथील चांगू काना ठाकूर (सीकेटी) महाविद्यालयात होणार्‍या मोफत आरोग्य तपासणी व औषधोपचार महाशिबिराच्या

नियोजनासंदर्भातील अंतिम आढावा बैठक माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या प्रमुख उपस्थितीत शुक्रवारी (दि. 2) झाली. या महाशिबिरातून रुग्णांना संपूर्ण सेवा देण्यासाठी जय्यत तयारी झाल्याची माहिती देण्यात आली.

सीकेटी महाविद्यालयात झालेल्या या बैठकीस व्यासपीठावर महापौर डॉ. कविता चौतमोल, भाजपचे जिल्हा प्रवक्ते वाय. टी. देशमुख, तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत, शहर अध्यक्ष जयंत पगडे, जिल्हा उपाध्यक्ष राजेंद्र पाटील, सभागृह नेते परेश ठाकूर, माजी उपमहापौर चारुशीला घरत, स्थायी समितीचे माजी सभापती मनोहर म्हात्रे, नगरसेवक अनिल भगत, राज्य परिषद सदस्य सी. सी. भगत, तालुका सरचिटणीस प्रल्हाद केणी, दशरथ म्हात्रे, महिला मोर्चाच्या तालुकाध्यक्ष रत्नप्रभा घरत, शहराध्यक्ष मुग्धा लोंढे, प्राचार्य वसंत बर्‍हाटे आदी उपस्थित होते.

या बैठकीत सर्व समित्यांनी आपल्यावर असलेल्या जबाबदारीचा आढावा सादर करून रुग्णांना परिपूर्ण सेवा देण्यासाठी व महाशिबिराच्या यशस्वितेसाठी सज्ज असल्याची ग्वाही दिली.

Check Also

महायुतीचे अधिकृत उमेदवार श्रीरंग आप्पा बारणे यांच्या प्रचाराची पनवेलमध्ये जोरदार मुसंडी

खासदार श्रीरंग बारणे पुन्हा एकदा खासदार होणार याची मतदारांकडून खात्री पनवेल:प्रतिनिधी  ३३ मावळ लोकसभा मतदार …

Leave a Reply