Breaking News

राणी रामपालसह सात हॉकीपटूंची कोरोनावर मात

बंगळुरू ः वृत्तसंस्था

कर्णधार राणी रामपालसह भारतीय महिला हॉकी संघाच्या सात खेळाडूंनी करोनावर मात केली आहे. त्यामुळे आता हे खेळाडू भारतीय क्रीडा प्राधिकरण (साई) केंद्रात प्रशिक्षण घेण्यासाठी उत्साहित आहेत. राणीसमवेत सविता पूनिया, शर्मिला देवी, रजनी, नवजोत कौर, नवनीत कौर आणि सुशीला यांच्यासह संघाचे व्हिडिओ विश्लेषक अमृत प्रकाश आणि वैज्ञानिक सल्लागार वेन लोम्बार्ड या कोरोनाचा संसर्ग झाला होता. 24 एप्रिल रोजी केलेल्या तपासणीत कोरोना पॉझिटिव्ह आढळल्यानंतर गेल्या दोन आठवड्यांपासून या सदस्यांना क्वारंटाइन ठेवण्यात आले होते. या कठीण काळात गरजूंना सर्वतोपरी मदत देण्याचे आवाहन कर्णधार राणी रामपालने देशवासीयांना केले. ती म्हणाली, अनेक लोक आपल्या जवळच्या व्यक्तींना गमावत आहेत आणि हे पाहून खूप वाईट वाटले. कृपया आपल्या जवळच्या आणि प्रियजनांना जितके शक्य होईल तितकी मदत करा. चला या साथीशी एकत्र लढूया. सुरक्षित रहा, मास्क घाला आणि कोरोनाशी संबंधित सर्व मार्गदर्शक तत्त्वांचे काटेकोरपणे पालन करा.

मी, माझा संघ आणि सहकारी कर्मचारी आता कोरोनातून पूर्णपणे बरे झालो आहेत. मित्र, चाहते यांचे मी आभार मानते. आमची चांगली काळजी घेतल्याबद्दल हॉकी इंडिया आणि ‘साइ’चे विशेष आभार!

 -राणी रामपाल

Check Also

केरळ विधानसभा निवडणुकीसाठी आमदार प्रशांत ठाकूर यांच्याकडून भाजपचा जोरदार प्रचार

पनवेल : रामप्रहर वृत्तकेरळ विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपने रणनीती आखली असून कासरगोड विधानसभा मतदारसंघाची जबाबदारी …

Leave a Reply