Breaking News

मुरूडमधील चोरढे शाळेत पालकांचे श्रमदान

परिसर स्वच्छता व परसबाग निर्मिती

रेवदंडा : प्रतिनिधी

मुरूड तालुक्यातील चोरढे येथील राजिप शाळेत पालकांच्या श्रमदानातून शाळा व परिसर स्वच्छता तसेच परसबाग निर्मिती करण्यात आली.

आझादी का अमृत महोत्सव या उपक्रमांतर्गत चोरढे शाळेत शिक्षक व विद्यार्थ्यांच्या वतीने विविध उपक्रम आयोजीत करण्यात आले होते. त्यामध्ये शाळेतील विद्यार्थ्यांचे पस्तीस पालक सहभागी झाले होते. त्यांनी श्रमदानाने शाळा व परिसरात स्वच्छता मोहीम राबविली  व ठिकठिकाणी लाद्या बसविल्या. तसेच परसबागेची  निर्मिती करून झेेंडू, मिरची, वांगी आदी रोपांची लागवड केली. यावेळी शाळेतील विद्यार्थ्यासाठी चित्रकला स्पर्धा घेण्यात आली.

Check Also

करंजा बंदराच्या विकासाला १८० कोटींचे भक्कम पाठबळ!

मच्छीमार बांधवांचे हित आणि उरणच्या सर्वांगीण विकासाला प्राधान्य ः आमदार महेश बालदी उरण : रामप्रहर …

Leave a Reply