Breaking News

गव्हाण विद्यालयाचे रवींद्र भोईर ‘रयत’च्या लाईफ मेंबरपदी

पनवेल : रामप्रहर वृत्त

श्री छत्रपती शिवाजी विद्यालय व जनार्दन भगत ज्युनिअर कॉलेजमधील उपशिक्षक रवींद्र शालिक भोईर यांची रयत शिक्षण संस्थेच्या लाईफ मेंबरपदी निवड करण्यात आली. रवींद्र भोईर हे संस्थेच्या लाईफ वर्कर व समन्वय समिती सदस्य या पदावर कार्यरत असतानाच लाईफ वर्करमधून लाईफ मेंबर या पदावर त्यांना बढती देण्यात आली आहे.

या वेळी उपमुख्याध्यापक जगन्नाथ जाधव आणि लाईफ मेंबर प्रमोद कोळी यांनी भोईर यांचा यथोचित गौरव केला. या सत्काराला उत्तर देताना रवींद्र भोईर यांनी संस्थेचे संस्थापक पद्मभूषण डॉ. कर्मवीर भाऊराव पाटील, तसेच विद्यालयाचे आधारस्तंभ, रयत शिक्षण संस्थेचे मॅनेजिंग कौन्सिल सदस्य माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, विद्यालयाच्या स्थानिक शाळा समितीचे चेअरमन आणि रयत शिक्षण संस्थेचे जनरल बॉडी व समन्वय समिती सदस्य अरुणशेठ भगत यांच्याविषयी आपली कृतज्ञता व्यक्त केली.

या वेळी विद्यालयाचे उपमुख्याध्यापक जगन्नाथ जाधव, पर्यवेक्षक दीपक भर्णुके, ‘रयत’चे लाईफ मेंबर प्रमोद कोळी, जुनिअर कॉलेज विभाग प्रमुख प्रा. बाबुलाल पाटोळे व सर्व अध्यापक उपस्थित होते.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक विद्यालयातील उपशिक्षक सागर रंधवे यांनी, तर पर्यवेक्षक दीपक भर्णुके यांनी आभार मानले.

Check Also

लोकसभेचा ‘मत’संग्राम

जगातील सर्वांत मोठी लोकशाही असलेल्या भारतात लोकसभेची निवडणूक होत आहे. हा सामना भाजपप्रणित राष्ट्रीय लोकशाही …

Leave a Reply