Breaking News

आमदार प्रशांत ठाकूर यांची मविआ सरकारवर खरमरीत टीका

मुंबई : काँग्रेसला नाना पटोले यांची पक्षाच्या प्रदेशाध्यक्षपदी निवड करायचीच होती, तर विधानसभा अध्यक्ष म्हणून का निवडले, असा प्रश्न उपस्थित करत महाविकास आघाडी सरकार ड्रामेबाजी करीत असल्याची टीका भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी ट्वीटरवर पोस्ट टाकून केली आहे. महाविकास आघाडी सरकारच्या ढिसाळ कारभारावरही त्यांनी खरमरीत टीका केली आहे.

2019 मध्ये आघाडी सरकार सत्तेवर आल्यावर नाना पटोले यांची विधानसभा अध्यक्ष म्हणून निवड झाली. महाविकास आघाडीच्या घटक पक्षांनी अक्षरशः पदे वाटून घेतली होती. त्यानंतर काही दिवसांत काँग्रेसने नाना पटोले यांची पक्षाच्या प्रदेशाध्यक्षपदी निवड केली. यावर आमदार प्रशांत ठाकूर यांनी प्रश्न उपस्थित केला आहे की नाना पटोले यांना प्रदेशाध्यक्ष करायचेच होते, तर विधानसभा अध्यक्ष का निवडले? त्यानंतरची दोन अधिवेशने अध्यक्षांविना झाली आहेत. मागील दोन अधिवेशनात विधानसभेला अध्यक्षच नव्हते. आता मनमानी कारभार करून, आघाडी सरकारने आवाजी मतदानाने अध्यक्ष निवडीचा विषय पुढे केला आहे. त्याला राज्यपालांच्या संमतीसाठी पाठविण्यात आले.

एकूणच ड्रामेबाजी करून राज्य सरकार मनमानी करत असल्याचे आमदार प्रशांत ठाकूर यांचे म्हणणे आहे.

Check Also

महायुतीचे अधिकृत उमेदवार श्रीरंग आप्पा बारणे यांच्या प्रचाराची पनवेलमध्ये जोरदार मुसंडी

खासदार श्रीरंग बारणे पुन्हा एकदा खासदार होणार याची मतदारांकडून खात्री पनवेल:प्रतिनिधी  ३३ मावळ लोकसभा मतदार …

Leave a Reply