Breaking News

आठ ग्रामपंचायतींसाठी रायगडात शांततेत मतदान

अलिबाग ः प्रतिनिधी

रायगड जिल्ह्यातील आठ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी रविवारी मतदान प्रक्रिया किरकोळ प्रकार वगळता शांततेत पार पडली. रात्री उशिरापर्यंत मतदानाची सरासरी घेण्याचे काम सुरु होते. प्रत्यक्षात सर्व ग्रामपंचायतींचे मतदान सरासरी 90 टक्केपर्यंत जाण्याची शक्यता आहे.

रायगड जिल्ह्यातील आठ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणूक प्रक्रियेला रविवारी सकाळी आठ वाजल्यापासून सुरुवात झाली. मतदानाचा हक्क बजावण्यासाठी तरुणांसह वृध्दांनी मतदान केंद्रावर गर्दी केली होती. सकाळपासूनच मतदान केंद्रावर मतदानासाठी रांगा लागलेल्या पहायला मिळाल्या. राजकीय पक्षांचे कार्यकर्ते मतदारांना मतदानासाठी बाहेर पडण्याचे आवाहन करीत होते. काही ठिकाणी दोन गटात शाब्दिक चकमक झाली होती. मात्र कुठेही अनुचित प्रकार घडला नाही. या  ग्रामपंचायतींच्या  जागांच्या निवडणुकीसाठी उभ्या असलेल्या उमेदवारांचे भवितव्य रविवारी मतदान यंत्रात बंद झाले. सोमवारी 10 वाजल्यानंतर तहसिल कार्यालयात प्रत्यक्ष मतमोजणीला सुरुवात होणार आहे. पुढील दोन-तीन तासांत संपूर्ण निकालाचे चित्र स्पष्ट होणार आहे.

मतदान प्रक्रीया शांततेत होण्यासाठी पोलिसांच्या मदतीने जिल्ह्यात पाच अधिकार्‍यांसह 57 कर्मचारी तैनात होते शिवाय एक स्ट्रायकिंग फोर्सही सज्ज होती .  ग्रामपंचायत निवडणुका या थेट पक्ष पातळीवर लढवल्या जात नसल्या तरी सर्वच प्रमुख राजकीय पक्षांनी त्या प्रतिष्ठेच्या केल्या आहेत . आगामी विधानसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर यातील विजय महत्वाचा आहे. उरण तालुक्यातील गोवठणे ग्रामपंचायतीमध्ये  जिल्हा परिषद शाळा येथे मतदान झाले. एकूण तीन प्रभागात एकूण मतदार 2180 होते पैकी 1815 मतदारांनी मतदान केले. सर्व मतदान प्रक्रिया शांततेत पार पडली. मतमोजणी सोमवार (दि. 24)रोजी उरण तहसील कार्यालय येथे सकाळी  10 नंतर होईल, होणार आहेत .

Check Also

‘प्रेम नगर’ है यह अपना….

हिंदी चित्रपटाने बायस्कोपपासून ओटीटीपर्यंत, सोळा एमएमपासून सत्तर एम.एम, सिनेमास्कोपपर्यंत, रस्त्यावरच्या पोस्टरपासून ते डिजिटल युगापर्यंत, मोनो …

Leave a Reply