Breaking News

आपली सोसायटी आपली जबाबदारी; पनवेलमधील मिडलक्लास सोसायटीत स्वच्छता अभियान

पनवेल ः रामप्रहर वृत्त

पनवेल येथील सोसायटी मित्र मंडळ आणि हॅप्पी मॅन गु्रपच्या वतीने ‘आपली सोसायटी आपली जबाबदारी’ या भावनेतून रविवारी (दि. 2) स्वच्छता अभियान आयोजित करण्यात आले होते. शहरातील मिडलक्लास हौसिंग सोसायटीच्या परिसरात हे स्वच्छता अभियान राबविण्यात आले. या अभियानादरम्यान जॉगिंग ट्रॅक आणि ग्राऊंडची साफसफाई करण्यात आली. या वेळी पनवेल महापालिकेचे सभागृह नेते परेश ठाकूर यांची प्रमुख उपस्थिती लाभली. या स्वच्छता अभियानात हॅप्पी मॅन गु्रपचे अनेश ढवळे, मदन कोळी, उद्योजक राजू गुप्ते, सुमित झुंजारराव, प्रशांत झुंजारराव, सुदर्शन पॉल, उल्हास झुंजारराव, रवी सोळंकी, अमेय देशमुख, अप्पा मानकामे, गिरीश जगे, सुरेश पुरोहित, राजन नावधर, गणपत भाई, श्री. माने, श्री. थोरात, श्री सारडा, श्री. निर्गुडे, श्री. खाडे, श्री. शिंदे, प्रवीण मोहोकर यांच्यासह सोसायटी क्रिकेट संघातील सदस्य सहभागी झाले होते.

Check Also

तब्बल 33 वर्षांपासून फरार असलेला खुनी पती गजाआड

पनवेल : वार्ताहर पत्नीला जिवंत जाळून फरार झालेला आरोपीचा तब्बल 33 वर्षांनंतर छडा लागला आहे. …

Leave a Reply