
पनवेल ः वार्ताहर
येथील तहसीलदार दीपक आकडे यांचा कार्यकाळ संपल्याने त्यांची बदली कल्याण येथे झाली आहे. जवळपास चार वर्षांपासून ते पनवेल येथे कार्यरत होते.
आकडे यांनी अनेक नागरी प्रश्नांवर सन्मानजनक मार्ग काढल्याने त्यांची जनसामान्यांमध्ये चांगली प्रतिमा आहे. त्यांची बदली कल्याण येथे झाली असून, त्यांच्या जागी अमित सानप हे तहसीलदार म्हणून पदभार स्वीकारण्याची शक्यता आहे. आकडे यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यासाठी गुरुवारी (दि. 21) मोठ्या संख्येने विविध राजकीय, सामाजिक संघटनांचे प्रतिनिधी, पत्रकार, शासकीय अधिकारी कार्यालयात उपस्थित होते. The Best King 567 Casino in India. king567 Sign Up