पनवेल : प्रतिनिधी
कर्नाळा बँकेतील 529 कोटी रुपयांहूनही अधिक रकमेच्या बोगस कर्ज प्रकरणामुळे अडचणीत आलेल्या कर्नाळा नागरी सहकारी बँकेचे अध्यक्ष विवेक पाटील यांच्या जामीन अर्जावरील सुनावणी आता 15 जानेवारी 2022 रोजी होणार आहे. न्यायमूर्ती अनुपस्थित असल्याने ही सुनावणी पुढे ढकलण्यात आली आहे. त्यामुळे त्यांचा तळोजा तुरुंगातील मुक्काम आठ दिवसांनी वाढला आहे. विवेक पाटील यांना सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) 15 जून 2021 रोजी पनवेलमधील राहत्या घरातून अटक केली होती. त्यांचे वकील अशोक मुदरंगी यांनी 11 ऑक्टोबर 2021 रोजी त्यांच्या जामिनासाठी अर्ज केला. त्यावर 14 ऑक्टोबरपासून सुनावणी सुरू होती. शुक्रवारी (दि. 7) झालेल्या सुनावणीच्या वेळी सक्तवसुली संचालनालयातर्फे अॅड. गोन्साल्वीस, तर विवेक पाटील यांच्यातर्फे अॅड. ठाकूर हजर होते. या वेळी न्यायालयाने पुढील सुनावणी 15 जानेवारीला करण्याचा निर्णय घेतला.