Breaking News

पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाला समर्थन देण्यासाठी खारघरमध्ये स्वाक्षरी मोहीम

खारघर : रामप्रहर वृत्त

जगातील सर्वांत लोकप्रिय नेता तसेच आपल्या देशाचे कणखर नेतृत्व नरेंद्र मोदी पंजाब दौर्‍यावर असताना फिरोजपूर येथे पंजाब सरकारने ज्याप्रकारे मोदीजींवर हल्ला करण्यासाठी कट रचला होता. त्याचा निषेध करण्यासाठी तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतलेले अनेक धडाकेबाज निर्णय व त्यांच्या विचारासोबत असल्याच्या समर्थनार्थ खारघर मंडलाकडून स्वाक्षरी मोहीम मंगळवारी (दि.11) राबविण्यात आली.

या वेळी भारतीय जनता पक्ष खारघर मंडल अध्यक्ष ब्रिजेश पटेल, नगरसेवक प्रवीण पाटील, मंडल सरचिटणीस दीपक शिंदे, महिला मोर्चा अध्यक्ष वनिता पाटील, मंडल उपाध्यक्ष रमेश खडकर, सोशल मीडिया जिल्हा संयोजिका मोना अडवाणी, चिटणीस अनिता जाधव, महिला मोर्चा उपाध्यक्ष प्रतीक्षा कदम, प्रभाग 4 अध्यक्ष वासुदेव पाटील, सोशल मीडिया संयोजक अजय माळी, जेष्ठ नागरिक सेल संयोजक नवनीत मारू, आयटी सेल संयोजक रुपेश चव्हाण, शिक्षक सेल संयोजक संदीप रेड्डी, वैद्यकीय सेल संयोजक किरण पाटील, भटके विमुक्त मोर्चा संयोजक दिलीप आढे, सुमित सहाय, आशा शेडगे, अश्विनी भुवड, अशोक जंगीड, स्मिता आचार्य, संजय पाचपोर, हंसा पारघी, वैशाली प्रजापति, प्रकाशजी, अरविंद जाधव, नंदू दळवी, राजश्री नायडू, राजू तिवारी आदी उपस्थित होते.

भाजप कार्यकर्ते व नागरिकांनी स्वयंस्फूर्तीने पुढे येऊन झालेला घटनेचा निषेध करून नरेंद्र मोदी यांचे नेतृत्व भारताला महासत्तेकडे देईल, असा विश्वास दाखवत या स्वाक्षरी मोहिमेत उत्स्फूर्तपणे भाग घेतला.

Check Also

केरळ विधानसभा निवडणुकीसाठी आमदार प्रशांत ठाकूर यांच्याकडून भाजपचा जोरदार प्रचार

पनवेल : रामप्रहर वृत्तकेरळ विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपने रणनीती आखली असून कासरगोड विधानसभा मतदारसंघाची जबाबदारी …

Leave a Reply