Breaking News

मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा स्पर्धा: लोकनेते दि. बा. पाटील विद्यालयाची तालुकास्तरावर बाजी

पनवेल : रामप्रहर वृत्त
राज्य शासनाच्या मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा या स्पर्धेमध्ये पनवेल महापालिकेच्या लोकनेते दि. बा. पाटील विद्यालयाने तालुकास्तरावर बाजी मारली आहे.
मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा उपक्रमांतर्गत पनवेल विभागातील सुमारे 240 शाळांनी सहभाग घेतला होता. शिक्षण विभागाचे अतिरीक्त आयुक्त भारत राठोड, उपायुक्त गणेश शेटे व  प्रशासन अधिकारी कीर्ती महाजन  यांच्या सूचनेनूसार लोकनेते दि. बा. पाटील विद्यालयामधील अनुपमा डामरे, सरिता काकडे, विनिता तायडे, वैशाली सावळे, वैशाली  पाटील, चंद्रकांत वारगुडे, अर्चना माने, नीलम देवळे, जयश्री रोडे अशा सर्व शिक्षकांनी मेहनत घेतली होती. स्पर्धेंतर्गत प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेच्या अनुषंगाने शाळेच्या आवारात परसबागेची निर्मिती करून त्याद्वारे आरोग्यदायी भाज्यांची लागवड करण्यात आली होती. शैक्षणिक गुणवत्ता व वैयक्तिक विकासासाठी वाचन चळवळ सुरू करण्यात आली आहे. विविध स्पर्धा, शाळा सुशोभीकरण, इतर कला स्पर्धांचे आयोजन करण्यात आले. याचबरोबरीने विद्यार्थी, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांच्याकरिता आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. भविष्यात करीअर घडविण्यासाठी विशिष्ट कौशल्यावर आधारित तज्ज्ञांचे मार्गदर्शनपर व्याख्यानाचे आयोजनही यादरम्यान करण्यात आले होते.
पाच एकर भूखंडावर तीन मजली इमारतीसाठी पनवेल महापालिकेचे प्रशासक तथा आयुक्त गणेश देशमुख यांच्या मार्गदशनाखाली 12 कोटी रुपये खर्च करून ही शाळा बांधण्यात आली आहे. याठिकाणी इ. पहिली ते सातवी मराठी व इंग्रजी माध्यमाचे ज्युनिअर केजी व सिनीअर केजीचे वर्ग चालविले जातात.

Check Also

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रयत्नातून एक कोटी 35 लाख रुपयांच्या विकासकामांचा शुभारंभ

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल विधानसभा मतदार संघातील ग्रामिण भागात आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली …

Leave a Reply