Breaking News

राज्यातील 11 जिल्ह्यांत निर्बंध कायम

मुंबई ः प्रतिनिधी

राज्य शासनाने अनलॉकसंबंधीची नवी नियमावली सोमवारी (दि. 2) जारी केली. यामध्ये 25 जिल्ह्यांतील निर्बंध शिथिल झाले आहेत. त्यानुसार या जिल्ह्यांना वीकेण्ड लॉकडाऊनमध्ये दिलासा देण्यात आला असून सोमवार ते शनिवार रात्री 8 वाजेपर्यंत सर्व दुकाने सुरू राहणार आहेत. राज्यातील रुग्णसंख्या अधिक असलेल्या 11 जिल्ह्यांमध्ये मात्र लेवल-3चे नियम कायम ठेवण्यात आले आहेत. निर्बंध असलेल्या जिल्ह्यांमध्ये सांगली, सातारा, कोल्हापूर, पुणे, बीड, अहमदनगर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड, पालघर, सोलापूर या जिल्ह्यांचा समावेश आहे. या 11 जिल्ह्यांमध्ये निर्बंध कायम राहणार आहेत. मुंबई, मुंबई उपनगर आणि ठाणे जिल्ह्यात स्थानिक प्रशासन यावर निर्णय घेणार आहे. उर्वरित जिल्ह्यात शनिवारी सकाळी आठ ते दुपारी 3 वाजेपर्यंत दुकाने उघडली जातील, तर रविवारी पूर्णपणे बंद ठेवण्यात येतील. रविवारी केवळ अत्यावश्यक सेवेची दुकानेच सुरू राहतील.

नव्या नियमावलीनुसार काय सुरू, काय बंद?

शॉपिंग मॉलसह सर्व दुकाने सोमवार ते शुक्रवार रात्री 8 वाजेपर्यंत, तर शनिवारी दुपारी 3 वाजेपर्यंत सुरू राहतील. रविवारी दुकाने, मॉल बंद राहतील., सर्व सार्वजनिक उद्याने आणि मैदाने व्यायामाच्या उद्देशाने खुली ठेवता येणार., सर्व शासकीय आणि खाजगी कार्यालये पूर्ण क्षमतेने कार्यरत ठेवता येणार आहेत, मात्र शक्य असल्यास वर्क फ्रॉम होम सुरू ठेवावे. , सर्व कृषी उपक्रम, बांधकामे, औद्योगिक कामे, मालवाहतूक पूर्ण क्षमतेने सुरू करता येणार आहे., व्यायामशाळा, योग केंद्र, हेअर कटिंग सलून, ब्युटी पार्लर, स्पा 50 टक्के क्षमतेने सुरू राहणार, मात्र एसीचा वापर करता येणार नाही. रविवारी ही सेवा बंद राहील., सर्व चित्रपटगृहे, नाट्यगृहे आणि मल्टिप्लेक्स (स्वतंत्र आणि मॉलच्या आतील) पुढील आदेश येईपर्यंत बंद राहणार.,  मंदिरे, प्रार्थनास्थळे पुढील आदेशापर्यंत बंद राहतील.

लसीकरण झालेल्यांना लोकल प्रवासाची मुभा द्या; हायकोर्टाची राज्य सरकारला सूचना

मुंबई ः लसीकरण झालेल्या नागरिकांना लोकलने प्रवास करण्याची मुभा देण्याबाबत विचार करावा, अशी सूचना उच्च न्यायालयाने राज्य सरकारला केली आहे. वकिलांना प्रवासाची परवानगी देण्याच्या याचिकेवर झालेल्या सुनावणीदरम्यान हायकोर्टाने ही सूचना केली. दरम्यान, लोकलमध्ये तूर्तास सर्वांना प्रवेश देणे शक्य नाही, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे. पुढील टप्प्यात यावर विचार केला जाईल, असे त्यांनी सांगलीत बोलताना सांगितले. कोर्टाने सगळ्याच क्षेत्रातील लसीकरण झालेल्यांचा विचार करण्याची गरज असल्याचे म्हटले आहे. लोकांना लोकलअभावी प्रवास करणे कठीण होऊन बसले आहे. त्यामुळे त्यांचाही विचार करा, असे कोर्टाने सांगितले. यावर पुढील सुनावणी गुरुवारी होणार आहे.

Check Also

तापमानवाढीमुळे महायुतीच्या कार्यकर्त्यांनी प्रचारादरम्यान काळजी घ्यावी -खासदार श्रीरंग बारणे

कर्जत : प्रतिनिधी मावळ लोकसभा मतदारसंघातील शिवसेना, भाजप, राष्ट्रवादी, मनसे, आरपीआय, रासप व मित्रपक्ष महायुतीचे …

Leave a Reply