Breaking News

युतीतील समन्वयामुळे गीतेंचा विजय निश्चित -कोबनाक

म्हसळा : प्रतिनिधी

लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने श्रीवर्धन विधानसभा मतदारसंघाचे प्रमुख व भाजप जिल्हा उपाध्यक्ष कृष्णा कोबनाक यांनी म्हसळा तालुक्यातील पत्रकारांजवळ सुसंवाद बैठक घेतली. यामध्ये मतदारसंघाच्या विकासासोबत  म्हसळा तालुक्याचा विकास हाच भाजपचा ध्यास असे धोरण असल्याचे स्पष्ट करीत. राष्ट्रीय सुरक्षा व विकास या मुद्द्यावर युतीचा प्रचार केंद्रित आहे. महायुतीचे उमेदवार अनंत गीते यांचा विजय निश्चित असल्याचे कोबनाक यांनी सांगितले.

पालकमंत्री रवींद्र चव्हाण, जिल्हा अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या  नेतृत्वाने राष्ट्रीय व राज्यस्तरीय अनेक समस्या सोडविताना विविध विकासकामे, रखडलेले प्रकल्प मार्गी लावले. राज्य, जिल्हा, तालुका, गाव, वाड्यांतील रस्ते, मुख्यमंत्री ग्रामसडक योजना, गाववाडी जोड रस्ते केंद्रातील व राज्यातील सरकारने पुरी केली. त्यामुळेच म्हसळा तालुका, श्रीवर्धन मतदारसंघ व रायगड जिल्ह्यांत भाजपची संघटना मजबूत होत आहे, गाववाडी व बुथ पातळीवर कार्यकर्ता तयार होत असतानाच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरेंनी घेतलेल्या महत्त्वपूर्ण निर्णयामुळे शिवसेना, भाजपची एकसंध फळी शिवसेनेचे 32 रायगडचे उमेदवार अनंत गीते यांच्या प्रचाराची सकारात्मक वाटचाल करीत राहिली, त्यामुळे अनंत गीतेंचा विजय निश्चित असल्याचे कोबनाक यांनी आत्मविश्वासाने सांगितले.

केंद्राची राष्ट्रीय नेतृत्वाची धुरा पंतप्रधान नरेंद्र मोदी समर्थपणे सांभाळणारे नेतृत्व असल्याने आम्ही युतीच्या माध्यमातून अनंत गीतेंना केंद्रात पाठविणारच असे कोबनाक यांनी सांगितले.

म्हसळा तालुक्यातील रस्ते, मुख्यमंत्री सडक योजना, गाव-वाडी जोड रस्ते, नळ पाणीपुरवठा योजना अशा प्रत्येक विकासकामात राज्य शासनाचा महत्त्वाचा रोल असतो त्या अनुषंगाने आम्ही युतीच्या माध्यमातून पाभरे-चिचोंडा रस्ता केला. जांभूळ, घूम रुद्रवट, सकलप कोंड ते नेवरूळ -ठाकरोली-सांगवड, देहेन पाष्टी पांगळोली रस्ता ही कामे प्रगतिपथावर आहेत.

राष्ट्रीय पेयजल योजनेमध्ये तुरुंबाडी, काळसुरी, गोंडघर, सुरई मोहल्ला, खारगांव (बु), मांदाटणे, कलटे, बाऊल कोंड, सोनघर, रेवली, वाडांबा, कोंझरी, ठाकरोली, पानवे, वावे ह्या महत्त्वाच्या नळपाणी पुरवठा योजनांना अंतिम टप्प्यात मंजुरी दिली आसल्याचे प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे.

पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तरे देताना कोबनाक यांनी सुनील तटकरे व राष्ट्रवादी काँग्रेसवर जोरदार हल्ला करत सर्वच बाजूने संकटात व शेवटची घटका मोजणारे सुनील तटकरे व राष्ट्रवादी काँग्रेस भाजपचा जुमला यावर का बोलतात, त्यांना काय अधिकार, असा प्रतिप्रश्न करीत मुख्यमंत्री ग्रामसडक योजना, राज्य शासनाची नगरोत्थान योजना यांना तटकरे निधी कसे देणार ते पक्के थापेबाज आहेत.

राज ठाकरे यांच्या प्रचाराबाबत कोबनाक यांनी अत्यंत माफक उत्तर देत राजच्या प्रचाराने शिवसेना-भाजप-रिपाइं पक्षाचे कार्यकर्ते प्रचंड निष्ठेने, चिडून व आत्मविश्वासाने काम करीत असल्याचे सांगितले.

Check Also

कोप्रोली येथे पाणीपुरवठा योजनेचा शुभारंभ

भाजप तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत यांच्या हस्ते भूमिपूजन पनवेल : रामप्रहर वृत्त केंद्र सरकारची महत्त्वपूर्ण योजना …

Leave a Reply