Breaking News

आठ आसनी चारचाकी वाहनांत आता सहा एअरबॅग अनिवार्य : नितीन गडकरी

नवी दिल्ली : वृत्तसंस्था
चारचाकी वाहनांमध्ये प्रवास करणार्‍यांची सुरक्षितता वाढवण्यासाठी केंद्रीय रस्ते वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांनी शुक्रवारी (दि. 14) मोठी घोषणा केली आहे. आठ आसनी चारचाकी वाहनांमध्ये सहा एअरबॅग अनिवार्य करण्यात आल्याची माहिती ना. गडकरी यांनी दिली.
आपल्या ट्विटमध्ये मंत्री गडकरी म्हटले आहे की, आठ आसनी चारचाकी वाहनांमध्ये किमान सहा एअरबॅग अनिवार्य करण्यात आल्या आहेत. हा जीएसआर अधिसूचनेचा मसुदा मंजूर करण्यात आला आहे. केंद्रीय वाहतूक मंत्रालयाने याआधीच एक जुलै 2019पासून चालक एअरबॅग आणि 1 जानेवारी 2022पासून चालकासमोरील सह-प्रवासी एअरबॅगच्या फिटिंगची अंमलबजावणी अनिवार्य केली होती.
चारचाकी गाडींमध्ये पुढील आणि मागील दोन्ही कंपार्टमेंटमध्ये बसलेल्या प्रवाशांना टक्करांचा प्रभाव कमी करण्यासाठी एम 1 वाहन श्रेणी म्हणजेच आठ आसनी वाहनामध्ये चार अतिरिक्त एअरबॅग अनिवार्य करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.  भारतातील वाहनांना पूर्वीपेक्षा अधिक सुरक्षित बनवण्यासाठी हे महत्त्वपूर्ण पाऊल उचलण्यात आले आहे. एअरबॅग नियमांमुळे प्रवाशांची सुरक्षितता अधिक चांगली होईल, असेही ना. गडकरी यांनी म्हटले आहे.

Check Also

कळंबोलीत रंगणार कुस्त्यांचा आखाडा

विजेत्याला मिळणार पाच लाख रुपये व मानाची गदा पनवेल : प्रतिनिधीउदयोन्मुख खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी भारतीय …

Leave a Reply