Breaking News

खारघरमध्ये मराठावाडा विद्यापीठ नामविस्ताराचा वर्धापन दिन

खारघर : प्रतिनिधी

मराठवाडा विद्यापीठ नामविस्ताराला 28 वर्षांचा दीर्घकाळ पूर्ण झाल्याने यासंदर्भात नुकताच नामविस्ताराचा 28 वर्धापन दिन खारघर येथे आयोजित करण्यात आला. या वेळी आयोजित कार्यक्रमात शिक्षणतज्ज्ञ डॉ. जी. के. डोंगरगावकर यांनी सध्याच्या घडीला परदेशी शिक्षण संस्थांचा देशातील शिरकावाबाबत चिंता व्यक्त केली.

दर्जेदार शिक्षणाच्या नावाखाली विदेशी शिक्षण संस्थाना देशाची दारे सताड खुली करून देणारे नवे शैक्षणिक धोरण हे तमाम नागरिकांना राज्यघटनेने अभिवचन दिलेली संधीची समानता आणि समान दर्जा नाकारणारे आहे, असे प्रतिपादन शिक्षणतज्ञ प्रा. डॉ. जी. के. डोंगरगावकर यांनी मराठवाडा विद्यापीठ नामविस्ताराच्या 28 व्या वर्धापन दिनानिमित्त खारघर येथे आयोजित कार्यक्रमात बोलताना स्पष्ट केले. स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव यंदा साजरा होत असला तरी उच्च शिक्षण हे सर्व थरांपर्यंत न पोहोचता ते मूठभर वर्गाची मक्तेदारी बनले आहे, असे सांगून डॉ. डोंगरगावकर म्हणाले की, एकूण साक्षरतेपैकी अनुसूचित जाती जमातीतील केवळ तीन टक्के तर अन्य सर्व समाज घटकातील केवळ सात टक्के लोक सध्या उच्च शिक्षित आहेत. नवे शैक्षणिक धोरण हे शिक्षणाला महागडे करुन विशिष्ट वर्गाचाच अधिकार बनवणारे आहे. त्यातून दर्जेदार उच्च शिक्षणाला मुकणार्‍या समाजाची संख्या वाढेल असे स्पष्ट केले.

या कार्यक्रमाला सो. ना. कांबळे, एम. के. भालेराव, शिवराम मोहिते, नारायण वाघमारे, सुरेश कोरे आदींनी सहभाग घेतला. कोरोनाच्या नियमांचे पालन करून हा छोटेखानी कार्यक्रम पार पडला.

Check Also

पनवेलजवळील करंजाडे येथे शुद्ध पाण्याचा प्रकल्प

माफक दरात सेवा; नागरिकांची भागणार तहान पनवेल : रामप्रहर वृत्तनांदी व सनोफी फाउंडेशनच्या वतीने पनवेलजवळील …

Leave a Reply