आमदार महेश बालदी यांनी केले पक्षात स्वागत
उरण : वार्ताहर
उरणचे आमदार महेश बालदी यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेऊन उरण तालुक्यातील केगाव ग्रामपंचायत हद्दीतील शिवसेना, काँग्रेस व शेकापच्या कार्यकर्त्यांनी भारतीय जनता पक्षात जाहीर प्रवेश केला आहे.
केगाव आवेडा शिवसेना उपशाखाप्रमुख लक्ष्मण पाटील, प्रभाग क्रमांक 2च्या शिवसेना महिला उमेदवार कृपाली गणेश म्हात्रे, गणेश म्हात्रे, काँग्रेसचे ज्येष्ठ कार्यकर्ते चंद्रकांत पाटील, शेकापचे प्रभाकर पाटील, सुदेश कासेकर यांनी आमदार महेश बालदी यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला.
या वेळी भाजप तालुकाध्यक्ष रवी भोईर, तालुका सरचिटणीस सुनील पाटील, चाणजे विभाग अध्यक्ष तथा उद्योजक जितेंद्र घरत, केगाव अध्यक्ष अंकीत म्हात्रे, ग्रामपंचायत सदस्य अविनाश पाटील, अरविंद पवार, अक्षय अशोक पाटील, उदय म्हात्रे, गणेश पाटील, अतीश हुजरे, मिथुन पुरव, विराज म्हात्रे आदी उपस्थित होते.