Breaking News

महाडमध्ये सर्दी, खोकल्याच्या रुग्णांत वाढ

महाड : प्रतिनिधी

गेली कांही दिवस सकाळी थंड आणि दुपारी कडक ऊन अशा वातावरणामुळे महाड तालुक्यात सर्दी, खोकल्याच्या रुग्णसंख्येत वाढ झाली आहे. त्यातच कोरोना आणि त्याबाबत सोशल मीडियावरील वाढत्या प्रचारामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातवरण पसरले आहे. त्यामुळे घरीच उपचार घेण्याकडे रुग्णांचा कल वाढला आहे. सकाळी थंडी तर दुपारी उष्मा असे वातावरण मानवी आरोग्यावर परिणामकारक ठरत आहे. यामुळे ताप, थंडी, खोकला अशा संसर्गजन्य आजारांचा त्रास अनेकांना होवू लागला आहे. यामुळे दवाखान्यात रुग्णांची संख्या वाढली आहे. तर दुसरीकडे  कोरोनाचा फैलाव पुन्हा होत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण तयार झाले आहे. नियमित खोकला असेल मिठाच्या पाण्याच्या गुळण्या, स्वच्छता, गरम पाणी पिणे हे पारंपारिक उपाय करणे फायदेशीर ठरत आहेत.

Check Also

सौ. शकुंतला रामशेठ ठाकूर यांना यमुना स्त्री सन्मान पुरस्कार प्रदान

सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रातील भरीव योगदानाचा गौरव पनवेल ः रामप्रहर वृत्तइतिहासात तसेच आजच्या आधुनिक युगातही अनेक …

Leave a Reply