अलिबाग : रायगड जिल्ह्यात ओमान आणि दक्षिण आफ्रिका येथून दोन दिवसांपूर्वी आलेल्या नागरिकांना कोरोनाची लागण झाल्याचे निष्पन्न झाले आहे. ओमान येथून माणगावच्या गोरेगावमध्ये आलेली महिला आणि दक्षिण आफ्रिकेतून खारघर येथे आलेल्या पुरुषाला कोरोनाची लागण झाली आहे. दोघांचीही प्रकृती उत्तम असून त्यांचे घरीच विलगीकरण करण्यात आलेले आहे. यासोबतच दोघांसह त्यांच्या संपर्कात आलेल्यांचे नमुने पुणे येथील राष्ट्रीय विषाणू प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत. त्यामुळे त्याचा अहवाल आल्यानंतरच त्यांना ओमायक्रॉनची लागण झाली आहे की नाही हे कळणार आहे, मात्र हे दोघे कोरोना पॉझिटिव्ह निघाल्यामुळे जिल्हा आरोग्य यंत्रणेसह प्रशासन सतर्क झाले आहे.
Check Also
लोकनेते रामशेठ ठाकूर यांचा शरदरत्न जीवनगौरव पुरस्काराने सन्मान
मुंबई ः रामप्रहर वृत्तसमाजाच्या सुख-दुःखात सहभागी होणारे आणि कोणताही अभिनिवेश न ठेवता सर्वसामान्यांमध्ये मिसळून राहणारे …
RamPrahar – The Panvel Daily Paper