खालापूर : प्रतिनिधी
तालुक्याला स्वतंत्र सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यालय मिळाले असून मंगळवारी (दि. 18) उपविभागीय अधिकारी प्रशांत राखाडे यांनी या कार्यालयात कामकाज करण्यास सुरुवात केली.
खालापूर तालुक्याचे सार्वजनिक बांधकाम विभाग कार्यालय कर्जत येथे होते. त्यामुळे तालुक्यातील प्रत्येक कामासाठी नागरिकांना कर्जतला जावे लागत होते. त्यामुळे आर्थिक भार, शारीरिक श्रम लागायचे, त्यात संबंधित अधिकारी यांची भेट झाली नाही की दिवस फुकट जायचा.
खालापूर जर्नालिस्ट असोसिएशनच्या सदस्यांनी अध्यक्ष अरुण नलावडे यांच्या नेतृत्वाखाली मंगळवारी खालापूर सार्वजनिक बांधकाम विभाग कार्यालात जाऊन उपविभागीय अधिकारी प्रशांत राखाडे यांची भेट घेतली व सार्वजनिक बांधकाम विभागाच्या खालापूर तालुक्यातील अर्धवट व प्रगतीपथावर असलेल्या कामांविषयी चर्चा केली. यावेळी पत्रकार मेहबूब जमादार, विकी भालेराव, प्रसाद अटक उपस्थित होते.