पनवेल : रामप्रहर वृत्त
स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव, स्वच्छ सर्वेक्षण 2022 अंतर्गत पनवेल महानगरपालिका प्रभाग क्रमांक 17 व प्रभाग क्रमांक 20 मध्ये एसटी स्टँड, ओरियन मॉल, आयटीआय रोड येथे बुधवारी (दि. 19) विशेष स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. या वेळी पनवेल महानगरपालिका प्रभाग समिती ‘ड’ सभापती वृषाली वाघमारे, नगरसेवक प्रकाश बिनेदार, माजी उपमहापौर चारुशीला घरत, पनवेल महानगरपालिकेचे आरोग्य निरीक्षक शैलेश गायकवाड, स्वच्छ भारत अभियान कनिष्ठ सल्लागार सदाकत अली अन्सारी, स्वच्छता निरीक्षक अभिजीत भवर, साई गणेश इंटरप्राईजेस व्यवस्थापक राकेश भुजबळ, पर्यवेक्षक शरद उरणकर, रमेश गरूडे, गौतम जाधव, संदीप जाधव, उत्तम चिखलीकर, नितीन ठाकूर, क्रांती चितळे, विशाल गायकवाड, नंदू जाधव, तसेच स्वच्छतादूत
उपस्थित होते.