लोकनेते रामशेठ ठाकूर यांची उपस्थिती
पनवेल : रामप्रहर वृत्त
खांदा कॉलनी येथे भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून व ओम साई खांदेश्वर महिला व बाल मित्र मंडळाच्या वतीने खांदेश्वर कोकण महोत्सव 2023चे आयोजन करण्यात आले होते. हा महोत्सव 9 ते 19 फेब्रुवारीदरम्यान खांदा कॉलनीतील पोलीस ठाण्यासमोरील मैदानात रंगला. महोत्सवाच्या शेवटच्या दिवशी माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी भेट देत शुभेच्छा दिल्या.
यंदाचे हे या महोत्सवाचे 12वे वर्ष होते. या महोत्सवात खांदा कॉलनीवासीयांना विविध सांस्कृतिक कार्यक्रमांची मेजवानी मिळाली. या महोत्सवाचे उत्कृष्टपणे आयोजन केल्याबद्दल लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी पनवेल महापालिकेच्या माजी उपमहापौर सीताताई पाटील यांचे अभिनंदन केले.
या वेळी भाजप ओबीसी सेलचे जिल्हा सरचिटणीस दशरथ म्हात्रे, जिल्हा कार्यकारिणी सदस्य भीमराव पोवार, ज्येष्ठ नेते सदानंद पाटील, मोतीलाल कोळी, हरिदास वणवे, मिथुन दर्गे, चेतन जाधव, तन्मय सावंत, अमित बोरकर, संकेत गायकवाड, देवानंद म्हात्रे, देविदास खेडकर, विनायक मुंढे यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते, नागरिक उपस्थित होते.