Breaking News

पन्नास टक्के उपस्थितीची परवानगी द्यावी

मंडप डेकोरेटर्स संघटनेतर्फे मुरूड तहसीलदारांना निवेदन

मुरूड : प्रतिनिधी

मंडप, कार्यालय, हॉल, लॉन्समधील कार्यक्रमांना पन्नास टक्के उपस्थितीची परवानगी द्यावी, अशा मागणीचे निवेदन मुरूड तालुका मंडप डेकोरेटर्स संघटनेने  तहसीलदार रोशन शिंदे यांना दिले.

कोरोनामुळे सामाजिक, वैवाहिक, धार्मिक व राजकीय कार्यक्रमांना स्थगिती देण्यात आली आहे. त्यामुळे टेन्ट, मंडप, कॅटरिंग, बैंक्वेट हॉल, डीजे साउंड, लाईट, डेकोरेशन, इव्हेंट व्यवस्थापन इत्यादि सेवा देणारे  लोक प्रभावित होऊन आर्थिक अडचणीत सापडले आहेत.

दरम्यान, 50 लोकांच्या उपस्थितीत हॉटेल, बॅक्केट, हॉल, मंडप, फॉर्महाऊस, टेन्ट यात लग्नसमारंभ करण्याची परवानगी आहे. मात्र एवढ्या कमी संख्येत कार्यक्रम करण्यासाठी आयोजक सहमत नाहीत. त्यामुळे कार्यक्रम होत नसल्यामुळे संबंधित व्यवसायिक व त्यांच्यापासून अवलंबून असलेले परिवारांना आर्थिक चिंतेने ग्रासले आहे, असे निवेदनात म्हटले आहे. शासनाने मंडप, कार्यालय, हॉल, लॉन्समधील  सर्व प्रकारच्या कार्यक्रमांसाठी 50 टक्के उपस्थितीची परवानगी द्यावी अशी मागणी या निवेदनात करण्यात आली आहे. मुरूड तालुका मंडप डेकोरेटर्स संघटनेचे अध्यक्ष महेंद्र गार्डी यांनी तहसीलदार रोशन शिंदे यांना हे निवेदन दिले. या वळी संघटनेचे उपाध्यक्ष स्वप्निल गुंजाळ व सचिव अनिकेत गुंड यांच्यासह 30 सदस्य उपस्थित होते.

Check Also

लोकनेते रामशेठ ठाकूर कॉलेज, टीएनजी कॉलेजचा 100 टक्के निकाल

पनवेल : रामप्रहर वृत्त महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे फेब्रुवारी 2024मध्ये घेण्यात …

Leave a Reply