पनवेल : रामप्रहर वृत्त
दीपक फर्टीलायझर अॅण्ड पेट्रोकेमिकल्स कोर्पोरेशन लिमिटेड कंपनीच्या सीएसआर उपक्रमांतर्गत व ईशान्य फाउंडेशनमार्फत पनवेल तालुक्यातील 37 वाडी धारकांना जल उपसा सिंचनासाठी साहित्य वितरण करण्यात आले. या कार्यक्रमाचे मुख्य उद्धिष्ट हे शेतकर्यांचे उत्पन्न वाढवणे व कुटुंबाचा सर्वांगिण विकास साधने हे आहे.
दीपक फर्टिलायझर प्लांटचे हेड राधेश्याम शिंग, कंपनीचे प्रतिनिधी एव्हीपी कोर्पोरेट अफेयर्स अरुण शिर्के, सिनियर मॅनेजर अभिजित शिंदे यांच्या हस्ते जल उपसा सिंचनासाठी साहित्य वितरण करण्यात आले.
या कार्यक्रमांतर्गत एका लाभार्थ्यास अर्धा एकर क्षेत्रावरती आंबा लागवड करण्यास मदत केली जात आहे. असेच या झाडांचे योग्य संगोपन करण्यासाठी शेतकर्यांना प्रशिक्षण, लागणारी खाते व औषधे, पाणी व्यवस्थापनासाठी विविध प्रकारची जल उपसा साहित्य खरेदी करण्यास मदत केली जाते तसेच शेतकर्यांना भाजीपाला व फुलशेती करण्यास प्रोत्साहित केले जात आहे त्यासाठी लागणारे बियाणे व रोपेदेखील या उपक्रमांतर्गत दिले जात आहेत. या व्यतिरिक्त या उपक्रमणतर्गत शेतकर्यांना आंबा कलम बनविणे, भाजीपाला पिकाची ट्रे मध्ये रोपे बनविणे तसेच मोगर्याची रोपे तयार करण्याचे प्रशिक्षण व साहित्य दिले आहे.
या भागातील शेतर्यांनी हजारो रोपे बनविली आहेत व ती विकली जात आहेत यामधूनदेखील शेतकर्यांना चांगले पैसे मिळत आहेत.
या उपक्रमांतर्गत आतापर्यंत 586 लाभार्थींनी लाभ घेतला असून या उपक्रमांतर्गत 12000 पेक्षा जास्त आंबा लागवड केली गली आहे. काही शेतर्यांचे आंबा पिकाचे उत्पन्न देखीसुरू झाले आहे. सर्व आंबा फळे हे दीपक फर्टीलायझर कंपनीमध्ये विकली जात असून शेतर्यांना मार्केट पेक्षा जास्त भाव मिळत आहे. या उपक्रमामुळे शेतकर्यांच्या उत्पन्नाबरोबर पर्यावरण संवर्धनाचेही काम होत आहे.