Wednesday , June 7 2023
Breaking News

महात्मा गांधी पुण्यतिथीनिमित्त गव्हाण विद्यालयात अभिवादन

पनवेल : रामप्रहर वृत्त

रयत शिक्षण संस्थेच्या गव्हाण येथील श्री. छत्रपती शिवाजी विद्यालय व ज. आ. भगत ज्युनिअर कॉलेजमध्ये राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या पुण्यतिथीनिमित्त विनम्र अभिवादन करण्यात आले. ‘रयत’चे लाईफ मेंबर व समन्वय समिती सदस्य तसेच रयत को-ऑपरेटिव बँकेचे संचालक प्रमोद कोळी, ‘रयत’चे लाईफ मेंबर व समन्वय समिती सदस्य रवींद्र भोईर यांचे हस्ते गांधीजींच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. विद्यालयाचे उपशिक्षक सागर रंधवे तसेच कर्मचारी जनार्दन खैरे आणि इयत्ता दहावीचे निवडक विद्यार्थी या वेळी उपस्थित होते. राष्ट्रपिता महात्मा गांधी यांनी देशाच्या स्वातंत्र्य चळवळीत सत्य, अहिंसा आणि सत्याग्रह या आयुधांनी चैतन्य निर्माण करून प्राणपणाने लढा दिल्याचे प्रतिपादन विद्यालयाचे उपशिक्षक सागर रंधवे यांनी या वेळी केले. बापूजींच्या स्वप्नातील भारताचे अधुरे स्वप्न पूर्णत्वास नेण्यासाठी आपण निकराचा प्रयत्न करण्याची आवश्यकता असल्याचे ते म्हणाले.सोशल डिस्टन्सिंगचा वापर करून या वेळी इयत्ता दहावीच्या निवडक विद्यार्थ्यांनीही महात्मा गांधीजी यांना स्तब्धता राखून आदरांजली वाहिली.

Check Also

जिल्हा नियोजन समितीच्या विशेष निमंत्रित सदस्यपदी भाजपच्या चार जणांची नियुक्ती

पनवेल : रामप्रहर वृत्त महाराष्ट्र शासनाच्या वतीने रायगड जिल्हा परिषद नियोजन समितीच्या विशेष निमंत्रित सदस्यपदी …

Leave a Reply