पनवेल : प्रतिनिधी
नागबादेवी कलामंच, वसई यांच्या एकांकिकेतील समर्थ, वरद आणि छोटी द्रोणा या बालकलाकारांची भेट सुप्रसिध्द अभिनेत संजय मोने, सुप्रसिद्ध अभिनेते मकरंद अनासपुरे, अभिनेते व दिग्दर्शक विजय केंकरे यांचे जवळ झाली असता त्यांना त्यांच्या चेहर्यावरील आनंद बघण्यासारखा होता. मौनांतर-नागबादेवी कलामंच, वसई यांनी सादर केलेल्या एकांकिकेतील हे तीन बाल कलाकार होते. समर्थ आणि द्रोणाने एकांकिकेतील नायक-नायीकेच्या लहानपणीचा रोल केला. त्याचे प्रेक्षकांनी खूप कौतुक केले. त्या मुलांचे स्टेजवरचे वावरणे बोलणे अगदी सहज वाटत होते. छोट्या द्रोणाने नाटक संपल्यावर गप्पा मारताना मला सुप्रसिध्द अभिनेत संजय मोने यांना भेटायचे आहे, असे सांगितले. मग तिन्ही छोट्या कलाकारांची सुप्रसिध्द अभिनेत संजय मोने, सुप्रसिद्ध अभिनेते मकरंद अनासपुरे, अभिनेते व दिग्दर्शक विजय केंकरे यांची जवळ भेट घडवून आणली. त्यांनी ही त्यांचे कौतुक करून त्यांना चॉकलेट दिले. त्यांची चौकशी करून गप्पा मारल्या. त्यांच्याबरोबर फोटो काढले. त्यावेळी त्यांना झालेला आनंद पाहण्यासारखा होता. या ज्येष्ठ कलावंतांना तिघांनीही नमस्कार केला. या वेळी समर्थ वैभव जगताप याने सांगितले की, मी चौथीत शिकतोय, दादरला शाळेत जातो. वडिलांची बदली झाली म्हणून माझे कुटुंब वसईला आले, पण माझ्यासाठी चांगली शाळा मिळत नसल्याने मी दादरलाच शाळेत जातो. यापूर्वी शाळेत डान्समध्ये भाग घेतला होता. राजेश सरांचे अभिनयाचे क्लासला गेलो मग रोहन सरांच्या क्लासलामध्ये आलो तेथे मला ही भूमिका मिळाली. आज या नाटकात त्या दादाचा लहानपणीचा रोल केला, मला खूप चांगले वाटले. मला गर्दी पाहून भीती वाटली नाही. तीन आठवड्यात मला रोहन सरांनी शिकवले आणि पाठिंबा दिला म्हणून हे करू शकलो. वरद अभय पाटील याने सांगितले की, मी वसईला एम. जी. परुळेकर शाळेत सातवीत आहे. आमच्या खुन्टोडी (वाढवळ) समाजाचे कार्यक्रम असतात. त्यात मी पहिलीपासून काम करतोय. निलेश सर आमच्या शाखेत नाटक बसवतात. त्यांनी मला बोलावले म्हणून मी आलो. मी आमच्या समाजात आणि शाळेत राज्य पातळीवर नाटकात काम केले असल्यामुळे मला भीती वाटली नाही. इथे खूप मजा वाटली. मी डान्स पण करतो.द्रोणा पी. मावधन हीने सांगितले की, मी प्रायमरी स्कूल, वसई मध्ये पहिलीत आहे. मी यापूर्वी चार नाटके केली आहेत. दोन बालनाट्य केली आहेत. आता मौनांतर नाटक बोरीवलीला स्पर्धेत केले. त्यात आम्हाला म्हणजे आमच्या टीमला पाच ट्रॉफी मिळाल्या. आज मला खूप मजा वाटली. तिन्हीही मुलांनी आपल्या प्रतिक्रिया सुप्रसिद्ध अभिनेत्यांना भेटल्यानंतर दिल्या.