Breaking News

‘सीकेटी’त लिंग समानता विषयावर व्याख्यान

पनवेल : रामप्रहर वृत्त

जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेचे खांदा कॉलनी येथील चांगु काना ठाकूर आर्ट्स कॉमर्स अ‍ॅण्ड सायन्स कॉलेज पनवेल (स्वायत्त) च्या इंग्रजी विभागामार्फत ’लिंग समानता’ या विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आले. या व्याख्यानासाठी एस. एस. ए. कॉलेज, सोलापूरच्या प्रा. डॉ. अस्मा खान (इंग्रजी विभाग) प्रमुख वक्त्या म्हणून उपस्थित होत्या.

या व्याख्यानामध्ये प्रा. डॉ. अस्मा खान यांनी लिंग समानता व पारंपारिक लिंग भेदाच्या खुळचट कल्पनावरती प्रकाश टाकला त्यावेळी त्यांनी भारताच्या रूढी, परंपरा चालीरीती तसेच स्त्रियांच्या उन्नतीसाठी मारक असणार्‍या वेगवेगळ्या संकल्पने वरती हल्ला चढवला. शेवटी त्यानी भारताच्या उन्नतीसाठी लिंग समानता हा एक सक्षम मार्ग होऊ शकतो, असे सांगितले. या कार्यक्रमासाठी महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य प्रो. डॉ. एस. के. पाटील, अंतर्गत गुणवत्ता हमी कक्षाचे समन्वयक डॉ. बी. डी.आघाव, कला शाखाप्रमुख प्रो. डॉ. बी. एस. पाटील आदी प्राध्यापक व इंग्रजी विभागाचे विद्यार्थी उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या प्रास्ताविकामध्ये विभागाचे प्रमुख डॉ. राजेश येवले यांनी प्रास्ताविक केले, तसेच प्रा. सुर्यकांत परकाळे यांनी पाहुण्यांची ओळख करून दिली व प्रा. रूपाली आगलावे यांनी आभार प्रदर्शन केले. सूत्रसंचालन मनाली महाडिक हिने केले. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य प्रो.डॉ. एस. के. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ. राजेश येवले, प्रा. सुर्यकांत परकाळे व प्रा. रूपाली आगलावे यांनी विशेष परिश्रम घेतले. या नाविन्यपूर्ण विषयावर व्याख्यान आयोजित केल्याबद्दल जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थ्येचे चेअरमन माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, अध्यक्ष अरुणशेठ भगत, व्हाईस चेअरमन वाय. टी. देशमुख, आमदार प्रशांत ठाकूर, संस्थेचे सचिव डॉ.एस. टी. गडदे यांनी इंग्रजी विभागाचे कौतुक केले.

Check Also

लोकनेते रामशेठ ठाकूर कॉलेज, टीएनजी कॉलेजचा 100 टक्के निकाल

पनवेल : रामप्रहर वृत्त महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे फेब्रुवारी 2024मध्ये घेण्यात …

Leave a Reply