कर्जत ः बातमीदार
येथील होतकरू कलावंत, लेखक, दिग्दर्शक अशा तिहेरी भूमिकेत वावरणारे प्रदीप गोगटे यांनी वर्षभरापूर्वी निर्माण केलेल्या वळण या शॉर्ट फिल्मने आंतरराष्ट्रीय स्तरावर झेप घेतली आहे. 25 अवॉर्ड, तसेच 27 शॉर्टफिल्म फेस्टिव्हलमध्ये ‘वळण’ सन्मानित झाली आहे. उत्कर्ष इव्हेंट्सच्या वळण या शॉर्टफिल्मचे 29 जानेवारी 2022 रोजी रेकॉर्डिंग झाले होते. या शॉर्टफिल्मने नऊ आंतरराष्ट्रीय स्तरावरील अवॉर्डस्सह एकूण 25 अवॉर्ड मिळवून कर्जतचे नाव उंचावले आहे. मुख्य म्हणजे ‘वळण’मधील सर्व कलाकार स्थानिक आहेत. यामध्ये ऋत्वी ओसवाल, आरवी ओसवाल, राज साळवी, स्पंदन पडते, साईराज खंडागळे, राजवी डोंबे आणि स्फूर्ती पडते या बालकलाकारांसोबतच पूजा बंदरकर, विशाल रोकडे, आरती, दिगंबर म्हसकर, शर्वरी जाधव आणि हेमंत वाघुले यांनी भूमिका साकारल्या आहेत. कथा आणि दिग्दर्शन प्रदीप गोगटे यांचे आहे. डीओपी हृषिकेश दांडेकर, तर एडिटिंग प्रथमेश जाधव यांनी छान केले आहे. प्रॉडक्शन्स टीममध्ये दिलीप गोगटे, मितेश कोळी, मोहित जाधव, शुभम कलघटगी, नचिकेत लाड, बाबू सकपाळ, तुकाराम जाधव आहेत. स्टुडिओ साऊंड गॅरेजचे संजय पाठक यांचे संगीत, मेकअप अभय शिंदे व फोटो डिझाइन्स माधुरी गोगटे यांचे आहे.