पनवेल : रामप्रहर वृत्त
भारतीय जनता पक्ष पनवेल प्रभाग क्रमांक 19तर्फे ऑनलाइन वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ही स्पर्धा एकूण आठ गटांत असून, प्रभाग 19साठी मर्यादित आहे.
गट 1मध्ये सात वर्षांखालील मुले (भाषा मराठी), गट 2मध्ये सात वर्षांखालील मुली (भाषा मराठी), गट 3मध्ये 8 ते 12 वर्षांखालील मुले (भाषा मराठी), गट 4मध्ये 8 ते 12 वर्षांखालील मुली (भाषा मराठी), गट 5मध्ये सात वर्षांखालील मुले (भाषा इंग्लिश), गट 6मध्ये सात वर्षांखालील मुली (भाषा इंग्लिश), गट 7मध्ये आठ ते 12 वर्षांखालील मुले (भाषा इंग्लिश), गट 8मध्ये 8 ते 12 वर्षांखालील मुली (भाषा इंग्लिश) असे स्वरूप आहे.
स्पर्धेत भाग घेण्यासाठी स्पर्धकांनी व्हिडीओ जास्तीत जास्त दोन मिनिटांचा पाठवावा. त्यापेक्षा जास्त असल्यास ग्राह्य धरला जाणार नाही. व्हिडीओ सुस्पष्ट, पुरेसा उजेड असणारा व स्पष्ट आवाज असणारा असावा. भाषणातील आशय, भाषाप्रभूत्व, आवाजातील चढ-उतार, विषय-तयारी, हावभाव, वेशभूषा या गोष्टींचा विचार करून विजेते निश्चित केले जातील. व्हिडिओच्या प्रारंभी आपले नाव सांगून भाषणाला सुरुवात करावी. मूळ व्हिडीओमध्ये कुठेही एडिट केलेले आढळल्यास प्रवेशिका बाद करण्यात येईल. व्हिडीओ पाठविण्याची अंतिम तारीख 17 मेच्या रात्री 9 वाजेपर्यंत असून, व्हिडीओ 7502100100 किंवा 77570000 या व्हॉट्सअॅप क्रमांकावर पाठवावेत. विजेत्यांना आकर्षक चषक तसेच सर्व स्पर्धकांना सहभाग प्रशस्तिपत्रक देऊन सन्मानित करण्यात येणार आहे, असे कळविण्यात आले आहे.
Check Also
पनवेल विधानसभा क्षेत्रात नमो चषक 2025 भव्य क्रीडा महोत्सव
खारघरमध्ये भव्य क्रिकेट, कळंबोलीत कुस्ती, तर कामोठ्यात व्हॉलीबॉल, रस्सीखेच आणि फुटबॉल स्पर्धा पनवेल : रामप्रहर …