Breaking News

कळंबोलीत स्वच्छता आणि धुरीकरण; पनवेल महापालिकेतर्फे उपक्रम

कळंबोली : रामप्रहर वृत्त

पनवेल महापालिका हद्दीतील प्रभाग समिती ‘ब’मधील कळंबोली प्रभाग 10 येथे मंगळवारी (दि. 1) स्वच्छता व धुरीकरण करण्यात आले. पनवेल महापालिकेच्या माध्यमातून देशाच्या स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त महापालिका क्षेत्रात अनेक उपक्रम राबविण्यात येत आहे. यासोबतच स्वच्छ सर्वेक्षण 2022मध्ये पनवेल महापालिकेच्या माध्यमातून चांगले काम करून स्वच्छ पनवेल सुंदर पनवेल करण्याच्या दृष्टीकोनातून पाऊले उचण्यास येत आहेत. त्यादृष्टीकोनातून मंगळवारी कळंबोली सेक्टर 2 मधील हनुमान मंदिर ते सेन्ट जोसेफ शाळेपर्यंत फूटपाथवरील माती व साफसफाई आणि जंतूनाशक अथवा धुरीकरण औषधफवारणी करण्यात आली. या प्रकारे सेक्टर 2मध्ये विशेष जनजागृती स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. या वेळी प्रभाग समिती ‘ब’च्या सभापती प्रमिला पाटील, नगरसेवक अमर पाटील, नगरसेविका मोनिका महानवर, भाजप कळंबोली मंडल अध्यक्ष रविनाथ पाटील, उत्तर भारतीय अध्यक्ष केशव यादव, कळंबोली शहर मंडळ उपाध्यक्ष संदीप भगत, राजू दळवी, प्रभाग समिती ‘ब’चे आरोग्य निरीक्षक अरुण कांबळे, आरोग्य निरीक्षक संजय जाधव, स्वच्छता निरीक्षक अमोल कांबळे, स्वच्छता पर्यवेक्षक हरेश कांबळे, दीपक गवळी, राजेंद्र जाधव, सुपरवायझर दिपक म्हात्रे, विशाल खानावकर व स्वच्छता दूत उपस्थित होते. अभियानचे आयोजन कळंबोली शहर मंडळ सरचिटणीस दिलीप बिष्ट यांनी केले होते.

Check Also

रामबाग उद्यानाचा रविवारी वर्धापन दिन सोहळा

पारंपरिक लोकगीते व कोळीगीतांचा बहारदार कार्यक्रम पनवेल : रामप्रहर वृत्त दुबईच्या धर्तीवर पनवेल तालुक्यातील न्हावेखाडी …

Leave a Reply