Breaking News

खारघरमधील रामशेठ ठाकूर महाविद्यालयात व्यवसाय योजना स्पर्धा

खारघर : रामप्रहर वृत्त

जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या खारघरमधील रामशेठ ठाकूर वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयातील लेखा आणि वित्त विभागाने व्यवसाय योजना स्पर्धेचे आयोजन केले. प्राचार्य डॉ. संजय मराठे यांनी या स्पर्धा सध्याच्या स्पर्धात्मक युगात विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढवण्यासाठी अत्यंत उपयुक्त असल्याचे नमुद केले. या वेळी आयोजित स्पर्धेमध्ये महाविद्यालयातील लेखा आणि वित्त विभागातील विद्यार्थ्यांनी विविध प्रकारचे लघु व्यवसाय, महिलासाठी घरघुती व्यवसाय योजनाचे सादरीकरण केले. या स्पर्धेसाठी विद्यार्थी आणि विद्यार्थिनींनी उत्तम प्रतिसाद दिला. या स्पर्धेचे आयोजन लेखा आणि वित्त विभागाच्या प्रा. मानसी शाहा यांनी केले. हिरल पंडया यांनी स्पर्धेचे निरिक्षण केले. संस्थेचे चेअरमन माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी  ही स्पर्धा विद्यार्थ्यांच्या उज्वल भविष्यासाठी उपयुक्त असल्याचे नमूद करून विद्यार्थ्यांना प्रोत्साहन दिले.

Check Also

लोकसभेचा ‘मत’संग्राम

जगातील सर्वांत मोठी लोकशाही असलेल्या भारतात लोकसभेची निवडणूक होत आहे. हा सामना भाजपप्रणित राष्ट्रीय लोकशाही …

Leave a Reply