Wednesday , June 7 2023
Breaking News

‘फ्रेंड्स ऑफ नेचर’कडून वृक्षसंवर्धनाचा संकल्प

पनवेल : प्रतिनिधी

पनवेल तालुक्यातील मोहो-शिवकर-चिखले डोंगरावर असणार्‍या शिव भोलेनाथ मंदिर परिसरात वृक्ष लागवड आणि संवर्धनाचा ध्यास फ्रेंड्स ऑफ नेचर या ग्रुपने घेतला आहे. सध्याची तरुणाई व्यसनाधिनतेकडे मोठ्या प्रमाणात वळल्याचे पहावयास मिळते, मात्र याला अपवाद ठरत फ्रेंड्स ऑफ नेचर ग्रुप पनवेलने कोणत्याही शासकीय निधी आणि मदतीविना 208 वृक्षांचे रोपण जून 2021 मध्ये केले. यात फुलझाडे कांचन, बकुळी, गुलमोहर तर फळझाडे बदाम, जांभूळ, पेरू, लिंबू, तुळस, पिंपळ, वड, कडुलिंब, बांबू या झाडांचा समावेश आहे. ग्रुपचे सदस्य हर्षल पाटील, जयेश पाटील, विशाल पाठे, प्रदीप बराते, गिरीश पाटील, जयेश म्हात्रे, नयन पाटील, तन्वेश टोपले, निखिल टोपले, प्रणय म्हात्रे, अझहर शेख आदींनी स्व:खर्चाने वृक्ष संवर्धन करून जिल्ह्यातील इतर तरुणांसमोर नवीन आदर्श ठेवला आहे. जमिनीपासून जवळपास 100 ते 150 फूट उंच असणार्‍या डोंगरावर पाणी पुरवठा करण्याचे मोठे आव्हान तरुणांसमोर आहे. सध्या सोलर पॅनलच्या सहाय्याने वीजपुरवठा होत असून त्या विजेवरच दोन छोट्या मोटारने पाणीपुरवठा होत आहे, मात्र काही दिवसात उन्हाची झळ बसण्यास सुरुवात होणार असल्याने पाणी टंचाईची समस्या उद्भवणार आहे.

Check Also

जिल्हा नियोजन समितीच्या विशेष निमंत्रित सदस्यपदी भाजपच्या चार जणांची नियुक्ती

पनवेल : रामप्रहर वृत्त महाराष्ट्र शासनाच्या वतीने रायगड जिल्हा परिषद नियोजन समितीच्या विशेष निमंत्रित सदस्यपदी …

Leave a Reply