Monday , June 5 2023
Breaking News

मुरूडमध्ये जंजिरा मुक्ती संग्राम दिन उत्साहात

मुरूड : प्रतिनिधी

रायगड प्रेस क्लब व तालुका पत्रकार संघ यांच्या संयुक्त विद्यमाने मुरूडमध्ये सोमवारी (दि. 31) जंजिरा मुक्ती संग्राम दिन साजरा करण्यात आला. सकाळी शहरातील आझाद चौकात नगर परिषदेचे प्रशासक पंकज भुसे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. तालुका पत्रकार संघाचे माजी अध्यक्ष मेघराज जाधव यांनी जंजिरा मुक्ती संग्रामविषयी माहिती दिली.

मुरूडचे पोलीस निरीक्षक नितीन गवारे, नायब तहसीलदार गोविंद कौटुंबे, माजी तहसीलदार नयन कर्णिक, माजी पाणी पुरवठा सभापती पांडुरंग आरेकर, नगरसेवक प्रमोद भायदे, योगिता ठाकूर, अजित कारभारी, श्रीकांत सुर्वे, सुनील शेळके, एकदरा सरपंच रामकृष्ण आगरकर, प्रेस क्लबचे जिल्हाध्यक्ष भारत रांजणकर, तालुका पत्रकार संघाचे उपाध्यक्ष सिराज शेख, सचिव सुधीर नाझरे, सहसचिव नितीन शेडगे, खजिनदार गणेश चोडणेकर, प्रकाश सादरे यांच्यासह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. माजी अध्यक्ष संजय करडे यांनी आभार मानले.

Check Also

खारघरमध्ये बास्केटबॉल स्पर्धेस उत्स्फूर्त प्रतिसाद

आमदार प्रशांत ठाकूर यांची प्रमुख उपस्थिती खारघर ः प्रतिनिधी खारघर स्पोर्ट्स अकॅडमीच्या वतीने माजी खासदार …

Leave a Reply