Breaking News

सुधागड तालुकास्तरीय स्पर्धांमध्ये नेणवली शाळेच्या विद्यार्थ्यांचे यश

पाली : प्रतिनिधी

राष्ट्रीय मतदार दिनाचे औचित्य साधून सुधागड तहसील कार्यालय आणि शिक्षण विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने विविध स्पर्धा व उपक्रम घेण्यात आले होते. त्यात नेणवली येथील प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांनी भरघोस पारितोषिके पटकावली.

मतदार दिनाचे औचित्य साधून तहसीलदार दिलीप रायण्णावार व गटशिक्षणाधिकारी शिल्पा दास यांच्या मार्गदर्शनाखाली पाचवी ते सातवीच्या विद्यार्थ्यांसाठी विविध स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या. त्यातील निबंध, चित्रकला व रांगोळी स्पर्धेत नेणवली प्राथमिक शाळेच्या साक्षी कृष्णा खराडे हिने प्रथम क्रमांक पटकावला. तर आर्या किरण मगर हिने निबंध व रांगोळी स्पर्धेतद्वितीय आणि ओमकार प्रकाश वाघमारे याने निबंध स्पर्धेमध्ये तृतीय क्रमांक पटकावला.

या स्पर्धांचा बक्षीस समारंभ नुकताच पाली येथील ग. बा. वडेर हायस्कूलमध्ये झाला. या वेळी तहसीलदार दिलीप रायण्णावार, नायब तहसीलदार वैशाली काकडे, प्राचार्या डॉ. अंजली पुराणिक, गटशिक्षणाधिकारी शिल्पा दास, पर्यवेक्षक एस. एस. पायानी यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र व भेटवस्तू देऊन सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमास सर्व शिक्षक, नवमतदार व स्पर्धक विद्यार्थी उपस्थित होते.

Check Also

लोकसभेचा ‘मत’संग्राम

जगातील सर्वांत मोठी लोकशाही असलेल्या भारतात लोकसभेची निवडणूक होत आहे. हा सामना भाजपप्रणित राष्ट्रीय लोकशाही …

Leave a Reply