Breaking News

विवेक पाटलांच्या जामीन अर्जावर आता 8 फेब्रुवारीला सुनावणी

पनवेल : प्रतिनिधी
बोगस कर्ज प्रकरणामुळे अडचणीत आलेले कर्नाळा नागरी सहकारी बँकेचे अध्यक्ष आणि शेकापचे माजी आमदार विवेक पाटील यांच्या जामीन अर्जावरील सुनावणी 8 फेब्रुवारीपर्यंत पुढे ढकलण्यात आली आहे. त्यामुळे त्यांचा तळोजा तुरूंगातील मुक्काम वाढला आहे.
विवेक पाटील यांना सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) 15 जूनला पनवेलमधील राहत्या घरातून अटक केल्यापासून ते तुरूंगातच आहेत. त्यांच्या जामीनासाठी त्यांच्या वकिलांनी वरचेवर प्रयत्न केले आहेत. मात्र सार्वजनिक पैशांमधील घपला आणि कर्जप्रकरणातील भ्रष्टाचार यामुळे सर्वसामान्य ग्राहकांशी संबंधित हे प्रकरण असल्यामुळे विवेक पाटील यांना दिला मिळत नसल्याची चर्चा ज्येष्ठ वकिलांमध्ये आहे. तसेच या प्रकरणाचा आर्थिक फटका बसलेल्या कर्नाळा बँकेतील ठेवीदारांना मात्र अद्याप कोणताही दिलासा मिळालेला नाही. दरम्यान, या वेळी न्यायालयाने पुढील सुनावणी 8 फेब्रुवारीला दुपारी 2 वाजता करण्याचा निर्णय घेतला.

Check Also

उरण विधानसभा मतदारसंघातील रस्त्यांचा होणार विकास

आमदार महेश बालदी यांच्या मागणी व पाठपुराव्याने 40 कोटी रुपयांच्या कामाला प्रशासकीय मान्यता उरण ः …

Leave a Reply