Breaking News

खारघरमधील सिडकोचे बंद विरंगुळा केंद्र सभागृह नेते परेश ठाकूर यांनी केले खुले

पनवेल : रामप्रहर वृत्त
गेल्या अनेक दिवसांपासून बांधून तयार झालेले मात्र बंद अवस्थेत असलेले खारघरमधील सिडकोचे विरंगुळा केंद्र मंगळवारी (दि. 1) पनवेल महापालिकेचे सभागृह नेते परेश ठाकूर यांनी नागरिकांसाठी खुले केले. सिडकोच्या दुर्लक्षामुळे विरंगुळा केंद्र बंद असल्याने ज्येष्ठांची गैरसोय होत होती. ती सभागृह नेते परेश ठाकूर यांनी दूर केली आहे.
सिडकोने खारघर सेक्टर 8मध्ये ज्येष्ठ नागरिकांसाठी विरंगुळा केंद्र उभारले आहे, मात्र सिडकोकडे या केंद्राच्या उद्घाटनास वेळ दिसत नव्हता. तांत्रिक बाबींमुळे हे केंद्र सुरू होण्यास उशीर होत असल्याचे सांगण्यात येत होते. यामुळे परिसरातील नागरिकांची गैरसोय होत होती. ती लक्षात घेऊन पनवेल महापालिका सभागृह नेते परेश ठाकूर यांनी मंगळवारी विरंगुळा केंद्र सुरू केले. या वेळी बोलताना त्यांनी सिडकोने आमच्या भूमिकेचे स्वागत करायचे की केस करायची हे त्यांनी ठरवावे, परंतु केंद्राचा वापर व्हावा आणि याचा फायदा नागरिकांना व्हावा हीच आमची भूमिका असल्याचे स्पष्ट केले.
सभागृह नेते परेश ठाकूर यांच्यासमवेत भाजपचे खारघर शहर अध्यक्ष ब्रिजेश पटेल, स्थायी समिती सभापती नरेश ठाकूर, नगरसेविका आरती नवघरे, शहर सरचिटणीस कीर्ती नवघरे, युवा नेते समीर कदम, अमर उपाध्याय, केतन नवघरे, प्रभाग 6चे अध्यक्ष विलास निकम, संजय मुळीक, ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष अविनाश पाटील, सरचिटणीस श्री. मोरे, रमेश तपासे, अक्षय लोखंडे यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिक उपस्थित होते.

Check Also

लोकसभेचा ‘मत’संग्राम

जगातील सर्वांत मोठी लोकशाही असलेल्या भारतात लोकसभेची निवडणूक होत आहे. हा सामना भाजपप्रणित राष्ट्रीय लोकशाही …

Leave a Reply