Breaking News

‘एमकेसीएल’च्या माध्यमातून रोजगार आणि पदवीची संधी

पनवेल ः प्रतिनिधी

एमकेसीएलच्या माध्यमातून रोजगाराच्या अधिक संधींसाठी नवीन एमएससीआयटी दोन प्रकारात उपलब्ध करण्यात येत असून बारावीच्या विद्यार्थ्यांना ‘स्टायपेंडसह पदवीची संधी’ देणार असल्याची माहिती एमकेसीएलचे व्यवस्थापकीय संचालक विवेक सावंत यांनी गुरुवारी (दि. 12) झालेल्या पत्रकार परिषदेत दिली.  शहरातील आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात झालेल्या या परिषदेस एमकेसीएलचे कोकण समन्वयक जयंत भगत, सिंधुदुर्ग समन्वयक प्रणय लेले उपस्थित होते. सावंत यांनी पुढे माहिती देताना सांगितले कि, गेल्या दोन दशकांत तब्बल सव्वा कोटीहून अधिक जाणकारांनी चड-उखढ कोर्स केलेला आहे. आयटी क्षेत्रातील पायाभूत ज्ञान देणारा सर्वोत्तम कोर्स म्हणून या कोर्सची ओळख आहे. महाराष्ट्रा व्यतिरिक्त भारतातील अनेक राज्यात देखील महाराष्ट्र ज्ञान महामंडळाचा हा कोर्स चालवला जातो. चड-उखढ हा एकच कोर्स पूर्ण करण्यार्‍या विद्यार्थ्यांची संख्या पाहता हा एक जागतिक विक्रम आहे. बदलत्या काळानुसार विद्यार्थ्यांच्या करीअर विषयी अपेक्षांमध्ये बदल झाले आहेत. चड-उखढ कोर्सची संरचना आता केवळ शासकीय नोकरीसाठी उपयुक्त कोर्स किंवा आयटी अवेअरनेस अशी राहिली नाही. त्यामध्ये त्वरित रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणारे, जॉबसाठी तयार करणारे बदल करण्यात आले आहेत. यामुळेच चड-उखढ चे नवीन स्वरूप महाराष्ट्र ज्ञान महामंडळाने सादर केले आहे. चड-उखढ कोर्स आता जॉब रेडीनेस व आयटी अवेअरनेस अशा दोन पर्यायात उपलब्ध आहे. संगणक ज्ञान घेण्याच्या आपल्या उद्देशानुसार हे पर्याय असतील. रोजगाराच्या सर्वोत्तम संधिंसाठी चड-उखढ सोबत महाराष्ट्र ज्ञान महामंडळाकडून इंडस्ट्रीला पूरक, अधिक सक्षम करण्यासाठी संगणक ज्ञान देणारे विविध कोर्सेस देखिल चालवले जातात. यांना क्लिक् (घङळउ) कोर्सेस असे म्हणले जाते. या प्रकारचे प्रशिक्षण घेणार्‍या विद्यार्थ्यांना महाराष्ट्र ज्ञान महामंडळाच्या प्रमाणपत्रा व्यतिरिक्त यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापिठाची (धउचजण) मार्कशीट दिली जाते.

Check Also

कामोठे येथील लोकनेते रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलमध्ये दहावीच्या विद्यार्थ्यांचा शुभचिंतन सोहळा

कामोठे : रामप्रहर वृत्तरयत शिक्षण संस्थेच्या कामोठे येथील लोकनेते रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलमध्ये इयत्ता दहावीच्या …

Leave a Reply