Breaking News

मावळमध्ये सुमारे 58 टक्के मतदान

मावळ : रामप्रहर वृत्त

लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यात सोमवारी (दि. 29) नऊ राज्यांतील 71 जागांसाठी मतदान झाले. मतदानप्रक्रिया शांततेत पार पडली. महाराष्ट्रातील 17 जागांसाठी चुरशीने मतदान झाले असून, सर्वांचे लक्ष लागलेल्या मावळ मतदारसंघात सायंकाळी 6 वाजेपर्यंत प्राप्त आकडेवारीनुसार सरासरी 58.64 टक्के मतदान झाले आहे.

मावळ लोकसभा मतदारसंघात तुरळक प्रकार वगळता शांततेत मतदान झाले. मतदान प्रक्रिया सुरळीत व्हावी यासाठी 12 हजार 659 अधिकारी आणि कर्मचार्‍यांची  नेमणूक करण्यात आली होती. यातील पनवेल मतदारसंघात नागरिकांनी मतदानास प्रतिसाद दिला. मतदान केंद्रावर मतदारांना कोणत्याही प्रकारची अडचण होणार नाही याची काळजी घेण्यात आली होती. निवडणूक निर्णय अधिकारी, सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी, नोडल अधिकारी, मतदान केंद्राध्यक्ष, सहायक केंद्राध्यक्ष, मतदान अधिकारी व कर्मचारी असे मनुष्यबळ तैनात होते.

भौगोलिकदृष्ट्या मोठ्या असलेल्या मावळ लोकसभा मतदारसंघात घाटाखालील पनवेल, कर्जत, उरण या तीन आणि घाटमाथ्यावरील मावळ, चिंचवड व पिंपरी अशा सहा मतदारसंघांचा समावेश होतो. 23 मे रोजी मतमोजणी होईल.

Check Also

अनधिकृत व्यापार जिहादवर कडक कारवाई करा

आमदार प्रशांत ठाकूर यांची नागपूर अधिवेशनात जोरदार मागणी नागपूर : रामप्रहर वृत्त पनवेल महापालिका हद्दीत …

Leave a Reply