Breaking News

रोह्यात नथुराम मगर यांनी फुलवला कलिंगडचा मळा

रोहे : प्रतिनिधी

तालुक्यातील बाहे हे गाव मिरची व भाजीपाल्यासाठी प्रसिद्ध आहे. याच बाहे गावच्या परिसरात कुंडलिका नदीच्या किनारी गेल्या चार-पाच वर्षापासून भाजीपाला व मिरची सोबत कलिंगडाचा मळा बहरताना दिसत आहे. रोहा तालुक्यातील वाशी येथील नथुराम मगर, अनंत मगर हे शेतकरी कलिंगड पिकासाठी प्रसिद्ध आहेत. यातील नथुराम मगर हे गेल्या 30 पेक्षा जास्त कालावधीपासून कलिंगडाची शेत करीत आहेत. यंदा त्यांच्यासह मुन्ना लतीप शेटे, मतीन लतीप शेटे  यांनी बाहे येथे भाडेतत्त्वावर शेतजमीन घेत संयुक्तरित्या 54 एकरमध्ये कलिंगडाची लागवड केली आहे. सध्या त्यांच्या शेतात तीन ते 10 किलोपर्यंत कलिंगडे तयार झाली आहेत. स्वत:ची जमीन नसताना भाड्याने शेती घेत कलिंगडाचे चांगले उत्पादन काढून मगर बंधुंनी अन्य शेतकर्‍यांना आदर्श घालून दिला आहे. रोहा तालुक्यातील वाशी येथील शेतकरी नथुराम आणि अनंत मगर यांच्या कलिंगड पिकाची काढणी व विक्री सध्या सुरु आहे. मोठा आकार, लालभडक व गोड फळ असल्याने मगर बंधुं उत्पादित केलेल्या कलिंगडला चांगली मागणी आहे. त्यांच्या कलिंगडला घाऊक बाजारात 15 रुपयांच्या आसपास भाव मिळत आहे. ही कलिंगडे महाराष्ट्र व महाराष्ट्रा बाहेरही विक्रीला जात आहेत. या वर्षी 54 एकरमधून सुमारे 500 टन कलिंगडाचे उत्पादन मगर बंधुंना अपेक्षित आहे. कमी कालावधीत मेहनत, जिद्द आणि नियोजन करून शेतीतून चांगले उत्पादन मिळते, हे नथुराम आणि अनंत मगर यांनी आपल्या कामातून दाखवून दिले आहे.

Check Also

केरळ विधानसभा निवडणुकीसाठी आमदार प्रशांत ठाकूर यांच्याकडून भाजपचा जोरदार प्रचार

पनवेल : रामप्रहर वृत्तकेरळ विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपने रणनीती आखली असून कासरगोड विधानसभा मतदारसंघाची जबाबदारी …

Leave a Reply