Breaking News

जि. प. सदस्य महिलेचा विंचूदंशाने दुर्दैवी मृत्यू

अलिबाग : प्रतिनिधी

माणगाव तालुक्यातील निजामपूर गटातील जिल्हा परिषद सदस्या द्रौपदी पवार यांचा सोमवारी (दि. 29) सकाळी विंचूदंशामुळे अलिबाग येथील जिल्हा रुग्णालयात मृत्यू झाला. त्या 55 वर्षांच्या होत्या. त्यांच्या पार्थिवावर माणगावच्या कोस्ते आदिवासीवाडी या मूळगावी सायंकाळी अंत्यसंस्कार करण्यात आले.

द्रौपदी पवार या 27 एप्रिल रोजी कोस्ते गावाजवळ असलेल्या नदीवर गेल्या होत्या. तेथे त्यांना विंचूदंश झाला. त्यांना तातडीने माणगाव येथील उपजिल्हा रुग्णालयात प्राथमिक उपचार करून अधिक उपचारासाठी अलिबागच्या जिल्हा रुग्णालयात हलवण्यात आले. तेथे उपचार सुरू असताना सोमवारी त्यांचा मृत्यू झाला. 2016मध्ये झालेल्या निवडणुकीत त्या शिवसेनेच्या तिकिटावर जिल्हा परिषद सदस्य म्हणून निवडून आल्या होत्या.

Check Also

सर्वांनी शिवरायांचे विचार जगायला हवेत -लोकनेते रामशेठ ठाकूर

पनवेल : रामप्रहर वृत्तछत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्सव समिती गव्हाण यांच्यातर्फे छत्रपती शिवाजी महाराज जयंती …

Leave a Reply