Friday , June 9 2023
Breaking News

‘तो’ झेल सोडल्यानंतर दोन दिवस झोपला नव्हता हसन अली

कराची ः वृत्तसंस्था

गतवर्षी टी-20 विश्वचषक स्पर्धेतील उपांत्य सामन्यात ऑस्ट्रेलियाने रोमहर्षकरित्या पाकिस्तानचा पराभव केला. सामन्यात महत्त्वाच्या क्षणी पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज हसन अलीने क्षेत्ररक्षणात चूक केली. त्याने ऑस्ट्रेलियाचा फलंदाज मॅथ्यू वेडचा झेल सोडला. वेडनेच ऑस्ट्रेलियाला अंतिम सामन्यात पोहचवले. सामन्यानंतर हसन अलीली चाहत्यांच्या रोषाला सामोरे जावे लागले. सोशल मीडियावरही त्याला ट्रोल करण्यात आले. निर्णायक झेल सोडल्यानंतर हसनने त्याची झालेली अवस्था कथन केली आहे.

हसन म्हणाला, माझ्या कारकिर्दीतील हा आतापर्यंतचा सर्वांत कठीण क्षण होता आणि या गोष्टी लवकर विसरणे खूप कठीण आहे. व्यावसायिक खेळाडू असल्याने तुम्हाला पुढे जावे लागेल. खरे सांगायचे तर हे मी आजपर्यंत कोणाला सांगितले नाही, पण त्या सामन्यानंतर मी दोन दिवस झोपलो नाही. माझी पत्नी माझ्यासोबत होती आणि मला झोप येत नसल्याने तीही तणावात होती. मी शांत होतो आणि एका बाजूला बसलो होतो, कारण मी सोडलेला झेल माझ्या मनात येत राहिला. बांगलादेश दौर्‍यापूर्वी मी स्वत: ला तयार केले. बांगलादेशमध्ये मी तीन दिवसांत 500 झेल घेतले आणि

नो-बॉलच्या समस्येवरही काम केले, असे हसनने सांगितले.

Check Also

कायदा सुव्यवस्थेच्या प्रश्नावर शांतता कमिटीची बैठक

पनवेल : वार्ताहर सध्या महाराष्ट्रात सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट व स्टेटस वायरल होत असल्याने हिंदुत्ववादी …

Leave a Reply