Friday , June 9 2023
Breaking News

बोपण्णा-रामनाथन जोडीची विजयी सलामी

टाटा महाराष्ट्र खुली टेनिस स्पर्धा

पुणे ः प्रतिनिधी

रोहन बोपण्णा आणि रामकुमार रामनाथन या द्वितीय मानांकित भारतीय जोडीने टाटा महाराष्ट्र खुल्या टेनिस स्पर्धेची विजयी सलामी दिली. बोपण्णा-रामनाथन जोडीने अमेरिकेच्या जेम्स सेरेटानी आणि निकोलस मोनरो जोडीचे आव्हान 6-3, 3-6, 10-7 असे परतवून लावले.

युकी भांब्री आणि दिविज शरण या भारतीय जोडीला मात्र पराभव पत्करावा लागला. भारताच्याच साकेत मायनेनी आणि शशीकुमार मुकुंद जोडीने युकी-दिविज जोडीला 6-3, 6-4 असे सरळ सेटमध्ये नमवले. युकी-दिविजचा आधी डेनिस नोव्हाक आणि जाओ सौसा या जोडीशी सामना रंगणार होता, मात्र डेनिसच्या मांडीला दुखापत झाल्याने या जोडीला माघार घ्यावी लागली आणि त्यांच्या जागी मायनेनी-मुकुंद जोडीला मुख्य फेरीत प्रवेश मिळाला.

Check Also

कायदा सुव्यवस्थेच्या प्रश्नावर शांतता कमिटीची बैठक

पनवेल : वार्ताहर सध्या महाराष्ट्रात सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट व स्टेटस वायरल होत असल्याने हिंदुत्ववादी …

Leave a Reply