Breaking News

किल्ले रायगड ते अलिबाग शिवज्योत

शिवजयंतीनिमित्त कुलाबा क्रीडा प्रबोधिनीच्या मावळ्यांचा उपक्रम

अलिबाग ः प्रतिनिधी
हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांची तिथीनुसार जयंती बुधवारी (दि. 31) साजरी झाली. यानिमित्ताने अलिबागच्या कुलाबा क्रीडा प्रबोधिनीतर्फे किल्ले रायगड ते अलिबागेतील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यापर्यंतचे 125 किमी अंतर 12 तासांत शिवज्योत घेऊन धावत 50 शिवभक्तांनी पूर्ण केले.
छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार हे पुढील पिढीला ज्ञात व्हावे, त्यांचा पराक्रम कळावा यासाठी कुलाबा क्रीडा प्रबोधिनीतर्फे दरवर्षी शिवरायांची तिथीनुसार येणारी शिवजयंती वेगळ्या पद्धतीने साजरी केली जाते. या वर्षी पुणे जिल्ह्यातील शिवनेरी किल्ल्यावरून शिवज्योत आणली जाणार होती, मात्र कोरोना महमारीने पुन्हा डोके वर काढले असून पुणे जिल्ह्यात संचारबंदी असल्याने किल्ले रायगडावरून शिवज्योत आणण्यात आली, प्रबोधिनीचे यतीराज पाटील यांनी सांगितले.
किल्ले रायगडावरील राजसदरेवरून मंगळवारी (दि. 30) रात्री 10.30 वाजता छत्रपती शिवाजी महाराजांना वंदन करून शिवज्योत पेटवून उपक्रमास सुरुवात करण्यात आली. मुंबई-गोवा महामार्गावरून रोहा, चणेरा, रेवदंडामार्गे अलिबागेत शिवज्योत दाखल झाली. शहरातील महाराजांच्या पुतळ्याजवळ ही शिवज्योत ठेवण्यात आली. यानंतर कुलाबा क्रीडा प्रबोधिनीच्या मावळ्यांनी आरती करून व महाराजांना वंदन करून उपक्रमाची सांगता केली.

Check Also

कामोठे येथील लोकनेते रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलमध्ये दहावीच्या विद्यार्थ्यांचा शुभचिंतन सोहळा

कामोठे : रामप्रहर वृत्तरयत शिक्षण संस्थेच्या कामोठे येथील लोकनेते रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलमध्ये इयत्ता दहावीच्या …

Leave a Reply