Breaking News

सीएए, एनआरसी समर्थनार्थ माथेरानमध्ये रॅली

कर्जत : बातमीदार

सुधारित नागरिकत्व कायदा (सीएए) आणि राष्ट्रीय नागरिक नोंदणी (एनआरसी)ला पाठिंबा देण्यासाठी बुधवारी (दि. 11) माथेरानमध्ये हिंदुत्ववादी संघटनांनी रॅली काढली होती. लोक जागरण मंचने हिंदुत्ववादी संघटनांना एकत्र करून सीएए आणि एनआरसीला पाठिंबा दर्शविला.राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्थानिक अध्यक्ष हरिलाल मेहता यांच्या नेतृत्वाखाली तसेच भाजप शहर अध्यक्ष विलास पाटील यांच्या अध्यक्षतेखाली माथेरानच्या कम्युनिटी हॉल येथून रॅलीस सुरुवात झाली. या रॅलीत माजी भाजप अध्यक्ष वसंत कदम, प्रज्ञा प्रकोष्ठ कोकण प्रांत संयोजक नितीन कांदळगावकर, स्थानिक अश्वपाल संघटना उपाध्यक्ष हेमंत बिरामणे, रायगड धनगर समाज अध्यक्ष संतोष आखाडे, क्षेत्रीय मराठा समाजाचे माजी अध्यक्ष कुलदीप जाधव, नगरसेविका प्रतिभा घावरे, माजी नगरसेवक अवधूत येरफुले यांच्यासह राष्ट्रीय स्वयंसेवक संघ व भाजप कार्यकर्ते रॅलीत मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. रॅली रोहिदास नगर, पंचवटी नगरमार्गे राम चौक अशी फिरली. राम चौकात रॅलीचे रूपांतर सभेत झाले. या वेळी माथेरानकरांनी घोषणाबाजी करीत सीएए आणि एनआरसीला पाठिंबा दिला.

Check Also

पनवेलमध्ये भाजप स्थापना दिन उत्साहात साजरा

पनवेल : रामप्रहर वृत्तजगातील सर्वात जास्त सदस्य असलेल्या भारतीय जनता पक्षाचा स्थापना दिवस सोमवारी (दि. …

Leave a Reply