खारघर : रामप्रहर वृत्त
पनवेल महानगरपालिका प्रभाग 6चे नगरसेवक निलेश बाविस्कर यांच्या पुढाकाराने खारघर सेक्टर 18 मधील त्रिकोना पार्क येथे रविवारी (दि. 6) सामुदायिक सूर्यनमस्काराचे आयोजन केले गेले.
भारताच्या स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवांतर्गत देशभरात 75 कोटी सूर्यनमस्कार महायज्ञ आयोजित केले जात आहेत. विद्या भारतीची उपकंपनी संस्था क्रीडा भारती, विद्यार्थी परिषद, राष्ट्र सेविका समिती, विश्व हिंदू परिषद आणि इतर संघटनांनी हा उपक्रम राबविला आहे.
भारतीय जनता पक्ष, खारघर मंडल अध्यक्ष ब्रिजेश पटेल म्हणाले की, सूर्यनमस्कार कोरोनाच्या काळात बूस्टर म्हणून काम करेल, सर्व आसनांचा राजा सूर्यनमस्कार असून यामुळे शरीराला पूर्ण व्यायाम होतो. सूर्यनमस्कारामुळे शरीराच्या अंगाची लवचिकता, बुद्धीचा विकास तसेच मनाची शक्ती विकसित होते.
आयोजक निलेश बाविस्कर म्हणाले की, सूर्यनमस्कार करणे हे केवळ मोहिमेपुरते मर्यादित न राहता दैनंदिन जीवनात कायमस्वरूपी समाविष्ट केले पाहिजे जेणेकरून संपूर्ण समाजाचे आरोग्य बालकापासून वृद्धापर्यंत चांगले राखता येईल.
खारघर मंडल सरचिटणीस दीपक शिंदे म्हणाले की, सूर्यनमस्कार ही सात्विक आणि आरोग्यदायी योग कृती आहे, अमृत महोत्सवातील 75 कोटी सूर्यनमस्कार महायज्ञ हा देशाला जागृत करण्याचा आणि नव्या पिढीला स्वातंत्र्यप्राप्तीच्या इतिहासाची जाणीव करून देण्याचा कार्यक्रम आहे.
या अभियानात नगरसेवक निलेश बाविस्कर यांच्यासह खारघर मंडल अध्यक्ष ब्रिजेश पटेल, सरचिटणीस दीपक शिंदे, महिला मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष संध्या शारबिद्रे, सोशल मीडिया जिल्हा सह संयोजिका मोना अडवाणी, माजी नगरसेवक गुरुनाथ गायकर, शिक्षक सेल संयोजक संदीप रेड्डी, सोशल मीडिया उपाध्यक्षा कांचन बिर्ला, मुकेश गर्ग, स्नेहल बुधाई, मुशरत अन्सारी, शोभा मिश्रा, कनकलता सिंग, बबीता सिंग, आशा मोरे, माली मेडम, मोकाशीजी, मनोज भुजबलकर, बोरडेजी, मनोज पाटील, संदीप घोष, सुनील लोखंडे तसेच परिसरातील शेकडो नागरिक उत्स्फूर्तपणे सामूहिक सूर्यनमस्कार कार्यक्रमात सामील झाले.