Saturday , June 3 2023
Breaking News

पेणमध्ये विद्यार्थ्यांना लेखन साहित्याचे वाटप

पेण : प्रतिनिधी

माजी केंद्रप्रमुख कृष्णा वर्तक यांनी आपला 70 वा वाढदिवस पेण, वढाव, रामवाडी येथील विद्यार्थ्यांना लेखन साहित्याचे वाटप करून साजरा केला. कृष्णा महादेव वर्तक हे शिक्षण क्षेत्रातील एक आदर्श व्यक्तिमत्व आहेत. त्यांच्या 70 व्या वाढदिवसाचे औचित्य साधून बळीराम गणा हायस्कूल-वढाव, लिटिल एंजल्स स्कूल-पेण, ओम साई क्लासेस-रामवाडी, समर्थ क्लासेस-रामवाडी, मोठे वढाव येथील विद्यार्थ्यांना   लेखन साहित्याचे वाटप करण्यात आले. वाढदिवसानिमित्त कृष्णा वर्तक यांना वकील, डॉक्टर, पत्रकार, नातेवाईक, मित्रपरिवाराने शुभेच्छा दिल्या.

Check Also

शिवराज्याभिषेक दिन दिमाखात साजरा

महाड : प्रतिनिधी छत्रपती शिवाजी महाराजांच्या 350व्या शिवराज्याभिषेक दिन सोहळ्यानिमित्त राज्य शासनामार्फत रायगडावर शुक्रवारी (दि. …

Leave a Reply