Breaking News

रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलचे ज्युडो स्पर्धेत यश

पनवेल ः रामप्रहर वृत्त

पनवेल महानगरपालिका अंतर्गत तालुका क्रीडा संकुल, पनवेल येथे रायगड जिल्हास्तरीय ज्युडो स्पर्धा बुधवारी (दि. 21) पार पडल्या.

या स्पर्धेत रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलच्या विद्यार्थ्यांनी सहभाग घेऊन उज्ज्वल यश संपादन केले. ज्युडो स्पर्धेत यशस्वी झालेले विद्यार्थी ः प्रथम क्रमांक – सिद्धेश खडकर   ई-9/अ, अबुझर मुल्ला  ई-10/क, कश्यप पटेल – ई -12/क

द्वितीय क्रमांक ः उबादा खोनिया ई-10/क, आयुष यादव ई-10/क, शुभम शाकल्य ई-8/अ        

सदर विद्यार्थ्यांचे तसेच त्यांना मार्गदर्शन करणार्‍या मंदार  मुंबईकर यांचे संस्थेचे चेअरमन लोकनेते रामशेठ ठाकूर आणि  शाळेच्या मुख्याध्यापिका राज अलोनी यांनी विशेष कौतुक करून अभिनंदन केले आणि पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.     

Check Also

चित्रपट स्टूडिओतील मिनी थिएटर्स… एक वेगळं विश्व

आज मी जेव्हा परेल येथील राजकमल कला मंदिर स्टुडिओत जातो, तेव्हा अनेक गोष्टीसह तेथील मिनी …

Leave a Reply