वासांबे, गुळसुंदे, केळवणे विभागात विविध ठिकाणी भूमिपूजन
मोहोपाडा ः प्रतिनिधी
उरण विधानसभा मतदारसंघाचे आमदार महेश बालदी यांच्या स्थानिक विकास निधीतून व जिल्हा नियोजन अंतर्गत वासांबे, गुळसुंदे, केळवणे जि. प. विभागात विविध विकासकामांचे भूमिपूजन भाजप उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर व अन्य मान्यवरांच्या हस्ते रविवारी (दि. 3) झाले तसेच यानिमित्ताने मोहोपाडा साई मंदिर हॉल येथे कार्यकर्ता मेळावा झाला.
आमदार महेश बालदी यांच्या निधीतून व जिल्हा नियोजन अंतर्गत गुळसुंदे जि. प. विभागातील गुळसुंदे येथील शिवमंदिर सुशोभीकरण (25 लाख रुपये), आकुलवाडी येथील अंतर्गत रस्ता काँक्रीटीकरण (13 लाख रुपये), वावेघर येथे रस्त्यांचे सिमेंट काँक्रीटीकरण (15 लाख रुपये), वावेघर येथे अंगणवाडी बांधणे (8.5 लाख रुपये) सावळे येथे अंगणवाडी बांधणे (8.5 लाख); सार्वजनिक बांधकाम विभागाकडे केलेल्या प्रयत्न व पाठपुराव्यातून केळवणे जि. प. विभागातील राज्यमार्ग क्र. 107 गुळसुंदे ते राज्यमार्ग क्र. 104 कराडे खुर्द, जांभिवली, सवणे येथील रस्त्याची दुरुस्ती (एक कोटी 43 लाख 95 हजार), आमदार निधीतून कराडे खुर्द गावातील अंतर्गत रस्ते काँक्रीटीकरण (12 लाख रुपये); वासांबे जि. प. विभागातील आळी आंबिवली येथे अंतर्गत रस्ता काँक्रीटीकरण (15 लाख रुपये), आळी आंबिवली येथे अंतर्गत आरसीसी गटार बांधणे (15 लाख रुपये), मोहोपाडा पोसरी येथील तलाव सुशोभीकरण करणे (30 लाख रुपये), वासांबे जि. प. विभागात मोहोपाडा, चांभार्ली, वरोसे, नढाळ येथे हायमास्ट दिवे बसविणे (प्रत्येकी 2.99 लाख रुपये) या विकासकामांचे भूमिपूजन करण्यात आले.
यानिमित्ताने मोहोपाड्यात कार्यकर्ता मेळावा झाला. या मेळाव्यास आमदार प्रशांत ठाकूर आणि आमदार महेश बालदी यांच्यासह भाजप पनवेल तालुका अध्यक्ष अरुणशेठ भगत, खालापूर तालुका अध्यक्ष रामदास ठोंबरे, लक्ष्मण पवार, सरपंच ताई पवार, उपसरपंच राकेश खारकर, माजी सरपंच विजय मुरकुटे, वासांबे विभाग अध्यक्ष सचिन तांडेल, नगरसेविका चारुशीला घरत, प्रवीण खंडागळे, रवींद्र चितळे, माजी सरपंच अनिल पाटील, मोहोपाडा व्यापारी असोसिएशनचे सचिव अमित शहा, मनोज सोमाणी, अमित मांडे, रसायनी विभाग अध्यक्ष सचिन तांडेल, मंदार गोपाळे, प्रवीण जांभळे, भूषण पारंगे, आकाश जुईकर, भरत मांडे यांच्यासह आजी माजी सरपंच, पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.
आजच्या विविध विकासकामांबद्दल आमदार महेश बालदी यांचे मनापासून अभिनंदन करू या. त्यांच्या रूपाने असा आमदार मिळाला आहे की, जो आपल्या मतदारसंघाचा 24 तास विचार करीत असतो.
-आमदार प्रशांत ठाकूर, अध्यक्ष, भाजप उत्तर रायगड जिल्हा
रसायनी-मोहोपाडा परिसरात विकासाचे पर्व सुरू झाले आहे. यापुढेही कामे होतील. येथील नागरिकांना असह्य झालेल्या कोन-सावळे रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन जि.प. निवडणुकीची आचारसंहिता लागू होण्यापूर्वी करू.
–महेश बालदी, आमदार,