Breaking News

लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या उत्तम आरोग्यासाठी दर्ग्यावर चादर अर्पण

पनवेल ः वार्ताहर
रायगड जिल्ह्यातील पनवेल महानगराच्या मध्यवर्ती स्थापित लाखो लोकांचे श्रद्धास्थान हजरत पीर करमअली शाह दर्ग्यावर माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या उत्तम आरोग्यासाठी भाजप अल्पसंख्याक मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष, पिंपरी चिंचवड प्रभारी आणि
साप्ताहिक कोकण डायरीचे संपादक सय्यद अकबर यांनी चादर चढवून दुवा मागितली.
लोकनेते रामशेठ ठाकूर हे गोरगरिबांचे प्रश्न ऐकून सर्वांनाच मदत करतात. सकाळपासून त्यांच्याकडे लोकांची अक्षरशः रांग लागलेली असते. कोविडसारख्या वातावरणातदेखील त्यांचा मदतीचा ओघ जनसामान्यांसाठी थांबला नाही. स्वतःपेक्षा जनतेचे प्रश्न महत्त्वाचे असे त्यांचे ब्रीद कायम आहे. त्यामुळे त्यांना उत्तम आरोग्य मिळावे, त्यांचे कार्य अविरत राहावे यासाठी सय्यद अकबर यांनी हजरत
पीर करमअली शाह दर्ग्यावर प्रार्थना केली.
या वेळी भ्रष्टाचारविरोधी जन आंदोलनातील अण्णा हजारेंचे खंदे कार्यकर्ते अल्लाउद्दीन शेख, ज्येष्ठ पत्रकार किरण बाथम, इम्तियाज बेग, विलास बोडके उपस्थित होते.
तौफिक खांडे यांनी लवकरच होणार्‍या हजरत पीर करमअली शाह दर्गा संदल उत्सवाच्या निमित्ताने निशाण फडकवण्याचा कार्यक्रम झाला. या वेळी अनेक भाविकदेखील हजर होते.

Check Also

मोरबे धरणातील पाण्याचे न्याय्य वाटप आणि रायगड जलसंपदा नियामक प्राधिकरण स्थापन करा

आमदार प्रशांत ठाकूर यांची जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांच्याकडे मागणी मुंबई : रामप्रहर वृत्तरायगड जिल्ह्यातील झपाट्याने …

Leave a Reply